आइसक्रीमचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार, दाताने तोडल्या कानातील रिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:15 PM2019-03-08T23:15:14+5:302019-03-08T23:15:20+5:30
पाच वर्षीय मुलीला आइसक्रीमचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सुमनकुमार नंदकुमार झा याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ठाणे : पाच वर्षीय मुलीला आइसक्रीमचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सुमनकुमार नंदकुमार झा याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना १६ मार्च, २०१८ रोजी घडली होती.
आरोपी झा हा ठाण्यातील घोडबंदरचा रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी तो भांडुप येथे गेला होता. त्या वेळी तेथील पीडित ५ वर्षीय मुलगी त्याला खेळताना दिसली. जवळ कुणीच नसल्याने त्याने आइसक्रीमचे आमिष दाखवून तिला ठाण्यातील घोडबंदर रोड येथे आणले. येथील एका निर्जन जागेवर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, तिच्या कानातील सोन्यांच्या रिंगा दाताने तोडून तेथून पळ काढला.
या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून १७ मार्च, २०१८ रोजी त्याला अटक केली. या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी सादर केलेले पुरावे आणि १९ साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.