दुचाकीसाठी सुनेचा छळ; विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 10:57 PM2018-06-24T22:57:13+5:302018-06-24T22:57:25+5:30

सारसच्या छळाला कंटाळून त्या विवाहितेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली.

Torture for a two-wheeler; Suicide by setting fire to marriage | दुचाकीसाठी सुनेचा छळ; विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या 

दुचाकीसाठी सुनेचा छळ; विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या 

Next

भिवंडी - मोटार सायकल घेण्यासाठी सुनेने माहेरहून ५० हजार रुपये आणावे, अशी सासरच्या मंडळींची मागणी होती. यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत तगादा लावून तिला शिवीगाळ आणि मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. अखेर या छळाला कंटाळून त्या विवाहितेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना भिवंडीतील आझादनगरमध्ये घडली आहे. 

तस्लिमुनिशा अनवर आलम अंसारी (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला युसूफ (१) नावाचा मुलगाही आहे. मुंबई, मालवणी येथील माहेर असलेल्या तस्लिमुनिशा हिचे २ वर्षांपूर्वीच अनवर याच्यासोबत लग्न झाले होते.

या प्रकरणी मृतक तस्लिमुनिशा हिचा भाऊ मोहम्मद आजम अंसारी (रा. मालवणी) याने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती अनवर याच्यासह सासरच्या ५ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Torture for a two-wheeler; Suicide by setting fire to marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.