ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:26 AM2018-07-12T04:26:35+5:302018-07-12T04:26:58+5:30

ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

tourism ban in Thane district ! | ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

googlenewsNext

ठाणे  - एकीकडे सरकार राज्यातील नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार करीत असताना पावसाळ्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर उपाययोजना शोधण्याऐवजी कामचुकार प्रशासनाने अशा रीतीने थेट पर्यटनावरच निर्बंध आणल्याने पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाºयांच्या या तुघलकी फर्मानामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक व्यावसायिकांच्या पावसाळ्यातील रोजगारावरच गदा आली आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात, म्हणून त्या त्याठिकाणचे स्थानिक बेरोजगार तात्पुरते ढाबे, टेंट टाकून काकडी, चिंचा, बिस्किटे, चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात, रानभाज्या विकतात. यातून त्यांना तात्पुरता रोजगार मिळतो. शिवाय, लांबवरून आलेल्या पर्यटकांची सोयही होते. काही ठिकाणी पर्यटक मुक्कामाला येत असल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकांच्याही व्यवसायावर यामुळे गदा येणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनी जिल्हाधिकाºयांच्या या फर्मानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ते मागे घेण्याची मागणी केली आहे.

मनाईस्थळं

१ ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपासवरील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरकिनारा
२ कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, सुभेदारवाडा, गणेशघाट चौपाटी
३ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई धरण, आंबेटेंबे
४भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर.

५ शहापूर तालुक्यातील भातसा धरणस्थळ, कुंडन, दहिगाव, माहुली किल्ला, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत, सापगाव नदी, कळंबे नदीकिनारा.

काहींकडून स्वागत या सर्व ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांना धबधब्यावर जाणे, खोल पाण्यात उतरणे, दरीचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे, मद्य बाळगणे, मद्यधुंद होऊन प्रवेश करणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, धबधब्याच्या परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने घेऊन जाणे, ध्वनी, वायू, जलप्रदूषण करणे, अशा बाबीस प्रतिबंध केला, तो स्वागतार्ह असल्याचे काही ठाणेकरांचे मत आहे.

पर्यटकांत संताप : अशा प्रकारे पर्यटनस्थळच नव्हे, तर त्यापासून एक किमीपर्यंतच्या परिघात जाण्यास मनाई करण्याऐवजी प्रशासनाने सुरक्षा यंत्रणेसह आपले कर्मचारी धांगडधिंगा करणाºया पर्यटकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना सरसकट सर्वांना तेथे जाण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत आहे.

...तर कल्याण-नगर मार्गच बंद होईल
पर्यटनस्थळांच्या एक किमी परिघात पर्यटनबंदी म्हणजे नागरिकांनी जिल्ह्यातून कुठेच प्रवास करायचा नाही का? कारण बहुतेक पर्यटन स्थळे महामार्ग, राज्यमार्गांच्या एक किमी परिघात आहेत. माळशेज घाटातील बंदीमुळे तर कल्याण-नगर मार्गच बंद होईल.

Web Title: tourism ban in Thane district !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.