अंबरनाथच्या मलंगगड परिसरात पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:34+5:302021-07-16T04:27:34+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुशिवली गावाजवळील नदीत ...
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुशिवली गावाजवळील नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी येथे जीवघेणी गर्दी केल्याने पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे मनाई आदेशसुद्धा जारी केले आहेत. मात्र तरीही पर्यटक नदी, धबधबे अशा ठिकाणी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून फक्त विकेंडला नाकाबंदी आणि गस्त ठेवली जाते. त्यामुळे इतरदिवशी पर्यटनस्थळी पर्यटक मोठी जीवघेणी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात कुशिवली गावाजवळ असलेल्या नदीत पर्यटकांनी अशीच तुफान गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही अशापद्धतीने पर्यटनस्थळी गर्दी होत असेल, तर कोरोना फक्त विकेंडलाच होतो का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.