कसारा-आसनगाव वाहतूक पूर्ववत होण्यास 11 वाजण्याची शक्यता - मध्य रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 07:06 AM2018-09-14T07:06:49+5:302018-09-14T10:06:30+5:30

ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरुन घसरल्यानं कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे

tower wagon derailed between Asangaon and Kasara local service affected | कसारा-आसनगाव वाहतूक पूर्ववत होण्यास 11 वाजण्याची शक्यता - मध्य रेल्वे

कसारा-आसनगाव वाहतूक पूर्ववत होण्यास 11 वाजण्याची शक्यता - मध्य रेल्वे

Next

मुंबई - ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरुन घसरल्यानं कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास कसारा-उंबरमाळी दरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन घसरली. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपला रोष व्यक्त करण्यासाठी संतप्त प्रवाशांनी वासिंदमध्ये रेल रोको केला होता. दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत आम्ही दिलगीर आहोत.  सकाळी 11 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे ट्विट मध्य रेल्वेने केले आहे.

ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात रुळावरून घसरली. पहाटेपासून रुळावरुन घसरलेली व्हॅन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या दरम्यानच मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या. सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे कसारा स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आली नाही. त्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कसारा स्थानका जवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने नाशिकहून निघालेली पंचवटी एक्सप्रेस देवळाली स्थानकात गेल्या तीन तासापासून खोळंबली आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसून ही रेल्वे माघारी नाशिककडे पाठविणार की पुढे मुंबईला न्यायची याबाबत मुंबई किंवा भुसावळ येथील रेल्वे अधिकारी निर्णय घेतील असे सांगून देवळाली येथील वरिष्ठांनी हात वर केले आहेत त्यामुळे प्रवासी संतापले आहेत. मुंबईला जाणाऱ्या अनेक नोकरदारांनी मुंबईला जाण्यासाठीं अन्य मार्ग शोधले आहेत. परंतु अन्य प्रवासी देवळाली स्थानकात अडकले आहेत.

मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
११०६२ दरभंगा एलटीटी पवन एक्स्प्रेस
११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस
११०१६ गोरखपूर एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस
१८०३० शालिमार एलटीटी एक्स्प्रेस
१२८१० हावडा मुंबई मेल व्हाया नागपूर
११४०२ नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
१२११२ अमरावती मुंबई एक्स्प्रेस
१२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
१२१३८ फिरोजपूर मुंबई पंजाब मेल
१७०५८ सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्स्प्रेस
११०२५ भुसावळ पुणे एक्स्प्रेस
१२६१८ मंगला एक्स्प्रेस
२२१०२ मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

ठाणे : वासिंद रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा रेल रोको मागे



 















 



 

Web Title: tower wagon derailed between Asangaon and Kasara local service affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.