टावरे मैदान झाले समारंभाचे ठिकाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:09 AM2018-04-30T03:09:34+5:302018-04-30T03:09:34+5:30
शहरातील मुलांना खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच विविध सामन्यांच्या स्पर्धा भरवाव्यात, यासाठी पालिकेने बांधलेल्या परशराम टावरे स्टेडियमच्या आवारात सध्या लग्नकार्य सुरू असून
भिवंडी : शहरातील मुलांना खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच विविध सामन्यांच्या स्पर्धा भरवाव्यात, यासाठी पालिकेने बांधलेल्या परशराम टावरे स्टेडियमच्या आवारात सध्या लग्नकार्य सुरू असून आता मैदानावर आनंदमेळा लावण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. याप्रकरणी खेद व्यक्त करत नगरसेवक वसीम अन्सारी यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त मनोहर हिरे व महापौर जावेद दळवी यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या परशराम टावरे स्टेडियमवर क्रिकेटचे सामने भरवले जातात. तर, स्टेडियमच्या आवारात इतर खेळांचे सामने भरवले जात होते. त्यामुळे मैदानाच्या ठिकाणी खड्डे मारले जात नव्हते. परंतु, मैदानाच्या आवारात नेहमी लग्नासाठी परवानगी दिल्याने या ठिकाणी होणारे विविध खेळांचे सामने बंद झाले. तर, क्रिकेटचे सामने ज्या ठिकाणी होतात, त्या ठिकाणी भिवंडी फेस्टिव्हल-२०१८ भरवून तेथे आनंदमेळा सध्या सुरू आहे. तेथे झोपाळे लावण्यासाठी खड्डे खोदून मैदान खराब केले आहे. तेथे हा मेळा सुरू असल्याने स्टेडियमची नासधूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे या मैदानावर खेळण्याचा सराव किंवा सामने खेळण्याऐवजी या मैदानाचा उपयोग भविष्यात वाणिज्यवापरासाठी केला जाण्याची भीती व्यक्त करत या फेस्टिव्हलसाठी खेळाचे मैदान देणाºया अधिकाºयांवर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी नगरसेवक मो. वसीम मोह. हुसेन यांनी केली आहे.
टावरे स्टेडियममध्ये एक सभागृह आहे. तेथे सर्व प्रकारच्या समारंभांना परवानगी देण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत झाला आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी लग्नसमारंभ करण्याबाबत ठराव झालेला नाही. त्याचप्रमाणे क्रिकेट व इतर खेळाव्यतिरिक्त या मैदानावरही कोणतेही इतर कार्यक्रम किंवा वाणिज्यवापरासाठी ठराव घेतलेला नाही.