ठाण्यातील व्यापाऱ्यांकडे १४३ कोटींचा कर थकीत, गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 01:58 AM2019-12-02T01:58:15+5:302019-12-02T01:58:24+5:30

ठाणे जिल्ह्यात वस्तू आणि सेवाकर कायद्याखाली नोंदणीकृत व्यापा-यांची संख्या ८३ हजार एवढी आहे.

Traders in Thane will file a crime | ठाण्यातील व्यापाऱ्यांकडे १४३ कोटींचा कर थकीत, गुन्हा दाखल करणार

ठाण्यातील व्यापाऱ्यांकडे १४३ कोटींचा कर थकीत, गुन्हा दाखल करणार

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वस्तू व सेवाकर विभागाकडे नोंदणीकृत व्यापाºयांपैकी एक हजार २३७ व्यापाºयांनी १४३.०८ कोटींचा वस्तू व सेवाकर थकवल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या व्यापाºयांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर विभागाचे राज्य कर सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात वस्तू आणि सेवाकर कायद्याखाली नोंदणीकृत व्यापा-यांची संख्या ८३ हजार एवढी आहे. त्यापैकी २० हजार ४२७ व्यापाºयांनी त्यांचे मासिक विवरणपत्र भरले नसल्याचे वस्तू आणि सेवाकर विभागाच्या विशेष मोहिमेत आढळून आले आहे. त्यापैकी एक हजार २३७ व्यापाºयांकडे १४३.०८ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर थकीत असल्याची माहिती उघड झाली आहे. कर थकविणाºयांमध्ये जिल्ह्यातील मोठ्या व्यापाºयांचा समावेश आहे. या करचुकव्या व्यापाºयांविरुद्ध वस्तू आणि सेवाकर कार्यालयाच्या ठाणे विभागामार्फत करवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाºयांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. ज्या व्यापाºयांनी विवरणपत्रे भरलेली नाहीत, अशा दोन हजार २९६ व्यापाºयांची नोंदणी वस्तू आणि सेवाकर विभागामार्फत रद्द करण्यात आली असल्याचे राज्य कर सहआयुक्तांनी सांगितले. जे व्यापारी विवरणपत्र दाखल करणार नाहीत, अशा व्यापाºयांकडून वस्तू आणि सेवा खरेदी करणाºया व्यापाºयांनी दावा केलेल्या खरेदीवर भरलेल्या कराची वजावट नाकारण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, थकीत कराची रक्कम १० लाखांपेक्षा जास्त असलेल्या आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विवरणपत्र न भरलेल्या व्यापाºयांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यांच्याकडून करवसुलीची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
वस्तू आणि सेवाकर विभागाकडून करण्यात येणारी कारवाई टाळण्याकरिता व्यापाºयांनी त्यांची विवरणपत्रे आणि त्यानुसार देय असलेला कर विहीत मुदतीत भरावा, असे आवाहन राज्यकर सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Traders in Thane will file a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर