ठाणे स्टेशनच्या सॅटीस पुलावर एसटी बसच्या नादुरूस्तीमुळे वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 04:51 PM2022-07-26T16:51:05+5:302022-07-26T16:51:45+5:30

येथील रेल्व स्थानकाच्या गर्दीचा भार सांभाळणाºया सॅटीस पुलावरील रस्त्यात एसटी महामंडळाची बस नादुस्त झाल्यामुळे या पुलावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली.

traffic at satis bridge of thane station due to malfunction of ST bus | ठाणे स्टेशनच्या सॅटीस पुलावर एसटी बसच्या नादुरूस्तीमुळे वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल!

ठाणे स्टेशनच्या सॅटीस पुलावर एसटी बसच्या नादुरूस्तीमुळे वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल!

googlenewsNext

ठाणे

येथील रेल्व स्थानकाच्या गर्दीचा भार सांभाळणाºया सॅटीस पुलावरील रस्त्यात एसटी महामंडळाची बस नादुस्त झाल्यामुळे या पुलावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे शहरासह मीरा भार्इंदर, भिवंडीच्या दिशेने जाणाºया सर्व वाहनांचे वेळापत्रक मंगळवारी दुपारी १२.३० ते दीड वाजे दरम्यान पूर्णपणे कोलमडले. तर या कोंडीत अडकलेल्या बसमधील प्रवाश्यांसह ठाणे बाजारपेठेतील ग्राहकांनाही या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले.

ठाणे स्टेशनला लागून असलेल्या सँटीस पुलावर भार्इंदर जाणारी एसटी बस नादुरूस्त झाली. या बसमधील प्रवाश्यांनी खाली उतरून या बसला ‘दे धक्का’ मारला. मात्र बस सुरू होण्याचे नाव नाही. त्यामुळे जवळजवळ एक ते दीड तासाच्या कालावधीत सॅटीस पुलावर येऊन पुढे जाणाºया बसेससह वाहनांची प्रचंड कोंडी झाली. तर या पुलावरून जाणाºया स्थानक बस डेपोच्या बसेस, सॅटीवर जाण्यासाठी आलेल्या एमटीबसेस आदींची रांग सॅटीस, अशोक थेटरपासून तर थेट जिल्हा परिषदेपर्यंतच्या बाजारपेठेत या वाहनांची मोठ्याप्रमाणात कोंडी झाली. दीर्घवेळ वाट पाहिल्यानंतर अखेर बसेसमधील प्रवाश्यांनी उतरून पुढे जाण्याचा मार्ग शोधला.

या सॅटीस पुलावरून अन्यत्र जाणार्या सर्व वाहनांची प्रचंड कोंडी झाली. यामुळे बस प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शहरात धावणार्या टीएमटी व जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणारया एसटी बसेना या पुलावरून जाताही येत नव्हते बआणि अन्य मार्गाने ेकोंडीतून बाहेरही पडता येत नसल्यामुळे स्टेशनपर्यंतच्या बाजारपेठेत माठ्याप्रमाणात गर्दी झाली. सीएसएमटी स्थानकात लोकल पटरीवरून उतरल्यामुळे लोकल प्रवाश्यांना आधीच समस्या असताना ठाणे स्टेशनची गर्दी सांभाळणाºया सॅटीसवरही बस नादुरूस्त झाल्यामुळे वाहनांची कोंडी झाली. त्यामुळे या बसस्थानकांवरील प्रवाश्यांसह बसमधील प्रवाश्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: traffic at satis bridge of thane station due to malfunction of ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे