दहीहंडी उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात वाहतूक बदल; ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल

By अजित मांडके | Published: September 6, 2023 04:17 PM2023-09-06T16:17:53+5:302023-09-06T16:18:28+5:30

टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून तर, जांभळीनाका येथे ठाकरे गटाकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

Traffic changes at Police Commissioner ate on the occasion of Dahihandi festival; Change in traffic from place to place in Thane | दहीहंडी उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात वाहतूक बदल; ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल

दहीहंडी उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात वाहतूक बदल; ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात दहीहांडी उत्सव साजरा होणार आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असल्याने त्या त्या भागात वाहतुक कोंडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतुक कोंडीचा त्रास होऊ नये या उद्देशाने ठाण्यासह पोलीस आयुक्तालयात दहीहांडी उत्सवाच्या काळात वाहतुक बदल केले जाणार असल्याची माहिती वाहतुक पोलीसांनी दिली. परंतु यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होणार असल्याची चिन्हे निर्माण झाल्याने ठाणेकरांना पुन्हा त्याचा ताप सहन करावा लागणार आहे.

टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून तर, जांभळीनाका येथे ठाकरे गटाकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या कोर्टनाका मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेकडील वाहतूक कारागृह मार्गे, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथून वळविली आहे. तर, ठाणे स्थानकातून कोर्टनाकाच्या दिशेकडील वाहतूक नौपाडा-बी-केबिन आणि मूस रोड मार्गे वळविली आहे. त्यामुळे या पयार्यी मार्गांवर भार येणार आहे.
वसंत विहार येथील हिरानंदानी मिडोज भागात स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे उपवन, पवारनगर येथून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकाच्या दिशेने वाहतूक करणाºया वाहनांना त्यागराज इमारत येथे प्रवेशबंदी करण्यात येत आहे. येथील वाहने वसंत विहार चौकातून तुळशीधाम मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. तसेच खेवरा चौक येथून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकाच्या दिशेने वाहतूक करणाºया वाहनांना शिवसेना शाखेजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खेवरा चौक, दोस्ती इम्पेरिया इमारत, तुळशीधाम मार्गे वाहतूक करतील.

बाळकूम येथे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या साई जलाराम प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी आयोजित केली जात आहे. यासाठी साकेतहून कशेळी, काल्हेर मार्गे वाहतूक करणाºया वाहनांना बाळकूमच्या दिशेने वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. येथील वाहने महालक्ष्मी मंदीर मार्गे वाहतूक करतील. तर, कशेळीहून बाळकूमच्या दिशेने वाहतूक करणाºया वाहनांना कापूरबावडी मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढणार आहे.

मिनाताई ठाकरे चौकात भाजपचे पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दहीहंडी आयोजित केली आहे. मिनाताई ठाकरे चौकातून वाहन चालक उथळसर, खोपट आणि कोर्टनाका येथे वाहतूक करतात. चौकात मंडप आणि व्यासपीठ उभारल्याने वाहन चालकांना अडथळा होणार आहे. याशिवाय नौपाडा, घोडबंदर, वागळे इस्टेट आदींसह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणी  हंडीचे आयोजन आहे. येथेही वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे.
दुसरीकडे गोविंदा पथकांच्या वाहनांना ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बंदी असणार आहे. पथकांना त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर उभी करता येतील. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी, तीन हातनाका, धर्मवीरनगर नाका, नितीन कंपनी येथून ठाणे शहरात वाहतूक करणाºया राज्य परिवहन सेवेच्या बस, टीएमटी, बेस्ट आणि खासगी बसला वाहतूकीस बंदी असेल. ही वाहने कॅडबरी नाका, खोपटनाका, मिनाताई ठाकरे चौक, कोर्टनाका,आंबेडकर पुतळा येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतील. टॉवर नाका, गडकरी रंगायतन, मांसुदा तलावाच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी असणार आहे.

Web Title: Traffic changes at Police Commissioner ate on the occasion of Dahihandi festival; Change in traffic from place to place in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.