शहरातील वाहतूक कोंडी सुटणार? मीरा भाईंदरमधील चार रस्ते- एमएमआरडीएमार्फत अभ्यास सुरू
By admin | Published: June 8, 2015 11:57 PM2015-06-08T23:57:23+5:302015-06-09T03:40:20+5:30
वाहतुकीला पर्यायी रस्ते निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या चार पर्यायी रस्त्यांच्या अभ्यासाला मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.
भाईंदर : झपाट्याने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर शहरांतील वाहतुकीचे रस्ते वाढत्या वाहनांच्या प्रमाणात तोकडे पडत आहेत. वाहतुकीला पर्यायी रस्ते निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या चार पर्यायी रस्त्यांच्या अभ्यासाला मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.
शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असताना वाढत्या शहरीकरणामुळे येथील वाहनांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. वाहनांच्या तुलनेत येथील रस्ते तोकडे पडत असून केवळ एका मुख्य मार्गावरूनच शहरात ये-जा करता येते. शहरांतर्गत वाहतुकीचे अनेक मार्ग उपलब्ध असले तरी ते अरुंद असल्याने तेथील वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.
ती मार्गी लावण्याच्या उद्देशाने पालिकेने भुयारी वाहतूक मार्गाच्या पिमेकडील वाहने उत्तन, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व मीरा रोडमार्गे दहिसर लिंक रोडने निर्गमित करण्यासाठी तीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. त्यात भाईंदर (प.) रेल्वे स्थानक येथून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडे जाणारा रस्ता, पुढे मीरा रोडमार्गे दहिसर येथून जाणारा रेल्वे समांतर लिंक रोड तर दुसरा उत्तन-गोराईमार्गे मनोरीकडे जाणारा रस्ता, मोर्वा गावापर्यंतच्या बायपास रोडचा समावेश आहे. तसेच भुयारी मार्गाच्या पूर्वेकडील वाहने जेसल पार्क ते घोडबंदरमार्गे भाईंदर खाडी समांतरित पिम महामार्गाला जोडणार्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश आहे. हे रस्ते एमएमआरडीएमार्फत विकसित करण्यात यावे, यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ डिसेंबर २०१४ रोजी पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने एमएमआरडीएला १६ एप्रिल २०१५ रोजी पत्र पाठविल्याने एमएमआरडीएने २६ मे २०१५ रोजी पाठविलेल्या प्रत्युत्तरात प्रस्तावित चार रस्त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे.
............