भिवंडी बायपास रोडवर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:57 AM2020-07-29T10:57:51+5:302020-07-29T10:58:09+5:30
वाहतूक कोंडी दरम्यान कळव्याच्या मनिषानगर परिसरात एक मोठा वृक्ष कोलमडून पडल्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
ठाणे - भिवंडी बायपास रोडवर आज जीवघेणे वाहतूक कोंडी सुरु आहे. यामुळे वाहनांना जागेवरच रखडून राहावे लागत आहे. या कोंडीमुळे चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माजीवडा ब्रीज, कळवा ब्रीजपर्यंत ही वाहतूक कोंडी असल्यामुळे ऐन सकाळीच पीक अवरमध्ये या कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
या वाहतूक कोंडी दरम्यान कळव्याच्या मनिषानगर परिसरात एक मोठा वृक्ष कोलमडून पडल्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या घटणेत सुदैवाने जीवित हानी नाही. जिल्ह्यात आज गेल्या 24 तासात 232 मिमी. पाऊस पडला आहे. यातील सर्वाधिक पाऊस अंबरनाथला 70 मिमी, भिवंडीला 65 तर उल्हासनगर ला 51 मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणाच्या पाणलोट अवघा 26 मिमी पाऊस पडला आहे. यातूलनेत भातसा धरण, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, आंध्रा आदी पाणी पुरवठा करणार्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही आज पावसा चा जोर कमी असल्याचे आढळून आले आहे.