ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:36 PM2020-06-04T23:36:51+5:302020-06-04T23:40:12+5:30
ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे गुरु वारी सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर नौपाडयात झाड पडून तीन वाहनांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत या दोन्ही ठिकाणी मार्ग मोकळा केल्याची माहिती सूत्रांंनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: निसर्ग चक्र ी वादळाने आपली दिशा बदलली असली तरी झाडे पडण्याच्या घटना ठाणे शहरात सलग दुसऱ्या दिवशीही सुरु च होत्या. ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे गुरु वारी सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर नौपाडयात झाड पडून तीन वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुरु वारी सकाळी ठाणे शहरात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी काही भागात वा-यामुळे झाडांचीही पडझड झाली. यात कापूरबावडी नाका ते खारेगाव टोलनाका या रस्त्यावर एक झाड पडल्यामुळे या मार्गावर सकाळी ९ ते ९.३० दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच कळवा वाहतूक शाखेने हे झाड तोडून वाहतूकीतील अडथळे दूर केल्यानंतर साधारण १० वाजण्याच्या सुमारास हा मार्ग मोकळा झाला. गॅमन ते खारेगाव या मार्गावरही झाड पडल्यामुळे वाहतूकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हे झाड तातडीने हटविण्यात आले. तर नौपाडयातही उत्सव हॉटेलजवळ झाड पडल्यामुळे यात राजेश कुमार यांच्या रिक्षासह अन्य एक कार आणि टेम्पोचेही नुकसान झाले. या मार्गावरही आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत मार्ग मोकळा केल्याची माहिती सूत्रांंनी दिली.