औषधांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, चालक किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:58 PM2022-02-23T21:58:03+5:302022-02-23T21:58:28+5:30

Accident : कंटेनर चालक तेजप्रताप प्रजापती हा बुधवारी दमणवरुन न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघाला होता.

Traffic jam due to overturning of medicine container | औषधांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, चालक किरकोळ जखमी

औषधांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, चालक किरकोळ जखमी

Next

ठाणे: दमणवरुन घोडबंदर रोडमार्गे न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघालेला कंटेनर गायमुख जकात नाका येथील ठामपा शाळा क्रमांक ९७ जवळ उलटल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातग्रस्त कंटेनरमुळे ठाण्याकडे येणारी वाहतुकअर्धा तास खोळंबली होती. कंटेनर रस्त्याच्या बाजूला केल्यावर घोडबंदर रोडवरील वाहतुक पूर्वपदावर आली. या घटनेत कंटेनर चालकाच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कंटेनर चालक तेजप्रताप प्रजापती हा बुधवारी दमणवरुन न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघाला होता. घोडबंदर रोडने हा कंटेनर जात असताना गायमुख जकात नाका येथे चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीला चांगलाच ब्रेक बसला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथका सह कासारवडवली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या सुमारास जड आणि अवजड वाहतुक सुरू असल्याने तातडीने वाहतूक पोलिसांनी वाहतुक दुसऱ्या मार्गने वळवून रस्त्यावर उलटलेला कंटेनर क्रेनच्या मदतीने एका बाजूला केला. त्यानंतर अर्ध्या तासांनी या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. या घटनेत कंटेनर चालक प्रजापती (४३) याच्या डाव्या पायाला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच अपघातानंतर कंटेनरमधील सांडलेल्या तेलावरती माती पसरविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

'' या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेत, वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविल्याने काही मिनिटांसाठी वाहतूक कोंडी झाली होती. साधारण अर्ध्या तासानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. संदीप सावंत, पोलीस निरीक्षक, कासारवडवली वाहतुक उपशाखा,ठाणे.

 

Web Title: Traffic jam due to overturning of medicine container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.