नियोजन न करताच रस्त्यांची कामे सुरू झाल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी

By अजित मांडके | Published: April 24, 2023 04:55 PM2023-04-24T16:55:13+5:302023-04-24T16:55:22+5:30

: कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता एकाचवेळेस शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत.

Traffic jam in Thane as road works started without planning | नियोजन न करताच रस्त्यांची कामे सुरू झाल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी

नियोजन न करताच रस्त्यांची कामे सुरू झाल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी

googlenewsNext

ठाणे : कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता एकाचवेळेस शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला असून वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे, अशा आशयाचे ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर आगपाखड केली आहे. 

संपूर्ण ठाण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. जागोजागी खड्डे पाडून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवले आहेत. याचे काही नियोजन केले आहे, असे काही दिसून येतं नाही. हजारो कोटींचे रस्ते होतं आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण, या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. १ जून ते १ ऑक्टोबर कामे करता येत नाहीत. तसा शासकीय नियम आहे. ही कामे जरी केली तरी त्याचा दर्जा कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करून,  हे हजारो कोटी जे ठाण्याच्या विकासासाठी आणले आहेत ते पाण्यात वाहून गेले हे मनाला न पटणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास होतं आहे, तासन तास एका जागी जे उभे रहावे लागते. याला जबाबदार कोण? विशेष म्हणजे, वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वासूचना न देता, त्यांच्याकडून ना हरकत दाखला न घेता त्यांना अंधारात ठेवून कामे सुरु केली आहेत. त्यामुळे पोलिसांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खरंतर ठाणे महानगरपालिकेने हे सगळं तपासायला हवं होतं. महानगरपालिका डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे. त्यामुळे त्यांनी ते काही तपासले असेल असे मला वाटत नाही. या वाहतूक कोंडीसाठी कोणी जबाबदार व्यक्ती आहे का , असा सवालही त्यांनी केला आहे.

Web Title: Traffic jam in Thane as road works started without planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.