मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 02:47 PM2022-07-06T14:47:51+5:302022-07-06T14:52:19+5:30
साकेत पूल ते कोपरी चेकनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे अवघे १० मिनीटांचे अंतर पार करण्यासठी वाहन चालकांना तब्बल पाऊण तास लागत आहे.
विशाल हळदे -
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव, साकेत पूलावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा परिणाम बुधवारी वाहतूकीवर झाला. ठाण्याहून नाशिक, भिवंडी आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अथवा वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे यामुळे मोठे हाल झाले. महत्वाचे म्हणजे, यामुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास
— Lokmat (@lokmat) July 6, 2022
विशाल हळदे -#MumbaiNashikhighway#Trafficjampic.twitter.com/b1kO9NU5Zx
मुंबई-नाशिक मार्गावरून दिवसाला हजारो वाहने वाहतूक करतात. ठाणे, घोडबंदर येथून अनेक जण त्यांच्या वाहनाने नवी मुंबई, नाशिक किंवा भिवंडी गाठण्यासाठी साकेत पूल, खारेगाव मार्गाचा वापर करतात. परंतु गेल्याकाही दिवसांपासून या भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. बुधवारी सकाळी या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा खोळंबा झाला. साकेत पूल ते कोपरी चेकनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे अवघे १० मिनीटांचे अंतर पार करण्यासठी वाहन चालकांना तब्बल पाऊण तास लागत आहे.