Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

By नारायण जाधव | Published: September 16, 2022 10:44 AM2022-09-16T10:44:31+5:302022-09-16T10:44:57+5:30

Traffic Jam: आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे 

Traffic jam on Thane-Belapur route including Mulund- Airoli bridge | Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

googlenewsNext

- नारायण जाधव 
नवी मुंबई - आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे 

ऐरोली मुलुंड रात्रीपासून ट्रॅफिक जाम आहे. १० मिनिटांच्या प्रवासासाठी १ ते १.५  तास लागतो. त्यातच या भागात ऐरोली काटई मार्गातील पुलाचेही काम सुरू आहे. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचेही कोंडीमुळे मोठे हाल होत आहेत 
नवी मुंबईतीलठाणे-बेलापूर मार्गावरही मोठी वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने टीटीसी औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या व आयटी पार्क मध्ये कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या अनेकांनी लोकलचा आधार घेतल्याने तीवरील ताण वाढला आहे

Web Title: Traffic jam on Thane-Belapur route including Mulund- Airoli bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.