पत्रीपुलावरील वाहतूक ऐन गणेशोत्सवात बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:47 AM2020-08-20T00:47:40+5:302020-08-20T00:47:48+5:30

१९ ते २४ आॅगस्टदरम्यान, म्हणजे ऐन गणेशोत्सवात सहा दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

Traffic on Patripula closed during Ain Ganeshotsav | पत्रीपुलावरील वाहतूक ऐन गणेशोत्सवात बंद

पत्रीपुलावरील वाहतूक ऐन गणेशोत्सवात बंद

Next

कल्याण : कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पत्रीपूल पाडल्यानंतर तेथे नवीन पूल उभारण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचा गर्डर ठेवण्यासाठी पत्रीपुलाशेजारील पुलावर भली मोठी क्रेन ठेवून काम केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी १९ ते २४ आॅगस्टदरम्यान, म्हणजे ऐन गणेशोत्सवात सहा दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
नवीन पुलाच्या कामामुळे कल्याण-शीळकडे पत्रीपूलमार्गे ये-जा करण्यासाठी कल्याण-भिवंडी बायपास सर्कलनजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद असणार आहे. वाहनांनी खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपासमार्गे इच्छीत स्थळी जावे. कल्याण शहरातून कल्याण-शीळमार्गे पत्रीपुलावरून वाहतूक करणाऱ्यांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल, भवानी चौक, नेताजी सुभाष चौक, वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावरून आनंद दिघे पुलाकडे जाऊन इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
>पूर्व-पश्चिमेला सूचकनाक्याहून जाता येणार
कल्याण-नगर रोडवरून पत्रीपुलाकडे जाणाºया वाहनांना नेताजी सुभाष चौकात प्रवेश बंदी असेल. ही वाहने वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावरून इच्छीत जातील. कल्याण-शीळफाटा रोडवरून कल्याण पूर्व व पश्चिमेकडे वाहतूक करणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण सूचनाका येथे प्रवेश बंदी केली जाणार आहे.
कल्याण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी सर्व वाहने सूचकनाका येथे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.
कल्याण फाट्याकडून कल्याण पश्चिमेत येणारी वाहने खारेगाव टोलनाक्याकडून इच्छित स्थळी रवाना होतील. ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे. ही अधिसूचना सात दिवस अमलात राहणार आहे.

Web Title: Traffic on Patripula closed during Ain Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.