टोइंग करताना वाहतूक पोलिसाला शिवीगाळ; दोन तरुणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:06 AM2017-12-03T02:06:56+5:302017-12-03T02:07:03+5:30
रेल्वे स्थानक परिसरात गाडी टोइंग करण्याच्या वेळी दोन तरु णांनी वाहतूक पोलीस अधिका-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर : रेल्वे स्थानक परिसरात गाडी टोइंग करण्याच्या वेळी दोन तरु णांनी वाहतूक पोलीस अधिका-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरातील रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया गाड्या टोइंग व्हॅनवरील कर्मचारी शुक्र वारी सायंकाळी ५ वाजता उचलत होते. त्या वेळी विशाल आढाव व गणेश लष्करे या तरुणांचा सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सूळ यांच्याशी वाद झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी तरु णाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक पूर्वेचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेऊन पार्किंगबाबत सूचना केल्या. त्यानंतरही शुक्रवारी काही गाड्या रस्त्यावर, रस्ताकडेला वाहतूककोंडी होईल, अशा ठिकाणी उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला विशाल व गणेश यांनी लावलेली दुचाकी टोइंग पथकाने उचलली. त्या वेळी विशाल, गणेश या दोन तरु णांनी उचललेली गाडी जबरदस्तीने खाली ओढून घेतली. या वेळी टोइंग व्हॅनवर उपस्थित असलेले सूळ यांनी गाडीला जॅमर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा तरुणांना राग आल्याने ते सूळ यांच्या अंगावर धावून गेले व शिवीगाळ केली. याप्रकरणी वाहतूक पोलिसांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिससांनी दोघांना ताब्यात घेतले.