ठाण्यात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही वाहतूक पोलिसांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 09:07 PM2021-02-14T21:07:47+5:302021-02-14T21:11:42+5:30
अपघातात अनेकदा पादचाºयांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. यामुळेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रस्त्यावर अपघात होऊ नयेत, वाहतूक सुरळीत रहावी, हे पहाण्याबरोबच पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे रस्त्यांवरून चालता यावे, याचीही जबाबदारी पोलिसांकडे आहे. ही बाब अधोरेखित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर दिला आहे.
महानगरांच्या विस्तारीकरणाबरोबरच वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सध्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळेच वाहतूककोंडी होणे ही नित्याचीच बाब आहे. त्यातच विविध कामांसाठी रस्तेही खणलेले असतात. मेट्रोसारख्या प्रकल्पांची आणि स्मार्ट सिटीची कामेही ठाण्यात जोरदार सुरू असल्याने रस्त्यांची रु ंदीही कमी झाली आहे. उरलेल्या जागेत वाट्टेल तशा उभ्या राहाणाºया रिक्षा, फेरीवाले आणि अरुंद पदपथ अशा विविध कारणांमुळे या रस्त्यांवरून पादचाºयांना निर्धोकपणे चालणे ही मोठी कसरतच होते. त्यामुळे आता पादचाºयांना दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले, दिव्यांग तसेच अंध व्यक्ती यांना निर्धोकपणे रस्त्यावरून चालणे शक्य व्हावे, रस्ता ओलांडताना त्यांना अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस उत्स्फुर्तपणे मदत करीत आहेत. रस्ते सुरक्षेसंदर्भात राबविल्या जाणाºया विविध उपक्रमांचा रोख सुरक्षित वाहतुकीवर आणि सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, याबाबत जनजागृती करण्यावर आहे. मात्र, पादचाºयांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे, असे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. रस्त्यांवर पहिला अधिकार हा पादचाºयांचा असून नेमकी याच बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. अपघातात अनेकदा पादचाºयांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. यामुळेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. केवळ सुरक्षा मोहिमेपुरतेच नव्हे, तर पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस सदैव कटिबद्ध राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.