ठाण्यात जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ७६७ रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 02:29 PM2021-02-21T14:29:58+5:302021-02-21T14:33:30+5:30
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टसिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षांवर बंदी घातलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अशा ७६७ रिक्षा चालकांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टसिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षांवर बंदी घातलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अशा ७६७ रिक्षा चालकांवर कारवाई करुन तीन लाख ८७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्हयात कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. तसेच, कलम १४४ नुसार जमावबंदीही लागू असून तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही कोरोना संबंधीच्या नियमांचे नागरिकांकडून पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रिक्षातही दोनच प्रवाशांना प्रवासाची मुभा असतांनाही मीटरप्रमाणे चालणाºया तसेच शेअर रिक्षामध्येही दोन पेक्षा अधिक प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जात आहे. अशा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईचे आदेश उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार १९ फेब्रुवारीपासून ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
* १९ फेब्रुवारी रोजी अशा ३४१ तर २० फेब्रुवारी रोजी ४२६ रिक्षाचालकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध साथ प्रतिबधक कायदा १८८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये ११ चालकांनी जागीच दंडाची ही रक्कम भरली. उर्वरित चालकांकडून एक लाख ६८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसूली केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
* फ्रंट सीटवरुनही सर्रास प्रवास
शेअर रिक्षांमध्ये अनेक रिक्षाचालक तर मागे तीन आणि पुढे आपल्या शेजारीच उर्वरित प्रवाशांना बसवून नेतात. अशा फ्रंट सीटवर प्रवासी बसविणाºया १०१ चालकांच्या विरोधातही शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.