वाहतूक पोलिसांचा चार दिवसात ७९५ वाहनांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:52 PM2021-06-18T22:52:38+5:302021-06-18T22:58:08+5:30

कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांसह काळया फिल्म असलेल्या वाहन चालकांविरु ध्द्ची कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या चार दिवसात ७९५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

Traffic police cracks down on 795 vehicles in four days | वाहतूक पोलिसांचा चार दिवसात ७९५ वाहनांवर कारवाईचा बडगा

काळया फिल्म लावलेल्या सर्वाधिक ४८४ वाहनांचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्दे काळया फिल्म लावलेल्या सर्वाधिक ४८४ वाहनांचा समावेश१८ युनिटची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांसह काळया फिल्म असलेल्या वाहन चालकांविरु ध्द्ची कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या चार दिवसात ७९५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १९० मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायदयान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, कर्णकर्कश आवाज करणाºया १२१ मोटारसायकलचे सायलेन्सर तात्काळ काढून ते नष्ट करण्यात आले. तसेच काळया फिल्म असलेल्या काचा लावून प्रवास करणाºया ४८४ वाहनांवर मोटार वाहन कायदयानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्येही ४०४ वाहनांच्या काळया फिल्म तात्काळ उतरविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तालयातील जेष्ठ नागरीक तसेच लहान मुले यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाºया गोष्टींवर सध्या पोलिसांकडून लक्ष देण्यात येत आहे. त्यात अनेक दुचाकीस्वारांनी त्यांचे मोटार सायकल सायलेन्सरमध्ये बदल केले. त्यामुळे मोठया आवाजाने नागरीकांना तसेच लहान मुलांना त्याचा मोठया प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे निद्रानाशासारखे अनेक आजार बळावत आहेत. अशा तक्र ारी नागरिकांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे तसेच सोशल मिडीयाद्वारे वाहतूक पोलिसांकडे केल्या होत्या. ठाणे शहरातील अनेक नागरीक त्यांच्या चारचाकी वाहनांना परवानगी नसलेल्या काळया फिल्म काचांना लावून सर्वत्र वावरत आहेत. अशा प्रकारच्या वाहनांमध्ये बेकायदेशीर कृत्ये, महिलासंबंधी अत्याचार तसेच अनेक गुन्हेगारी
स्वरु पाच्या गोष्टी घडण्याचीही भीती आहे. पोलीस नाकाबंदीमध्ये तपासणी करताना अशा प्रकारच्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होतो. त्याअनुष्ंगाने वाहनाच्या मुळ ठेवणीमध्ये बदल करु न कर्कश आवाज करणाºया वाहनांवर तसेच काळया फिल्म असलेल्या वाहनावर कडक कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
ठाणे शहर वाहतुक शाखेने ठाण्यातील १८ वाहतुक उपविभागामार्फत १४ ते १७ जून २०२१ या कालावधीत मॉडीफाईड सायलेन्सर तसेच काळया फिल्म असलेल्या वाहन चालकाविरु ध्द् मोहीम राबविली. त्यामध्ये १९० दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली. तर १२१ मोटारसायकलचे मॉडीफाईड सायलेन्सर तात्काळ काढून ते नष्ट करण्यात आले. तसेच काळया फिल्म असलेल्या ४८४ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. तर ४०४ वाहनाचे ब्लॅक फिल्म्स तात्काळ काढून टाकण्यात आल्याचीही माहिती वाहतूक शाखेने दिली.

Web Title: Traffic police cracks down on 795 vehicles in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.