सातत्याने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांच्या दंडाच्या वसूलीसाठी वाहतूक पोलीस घरी धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:29 PM2021-06-23T18:29:10+5:302021-06-23T18:33:31+5:30
वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण्याची नोटीसही तो बजावणार आहे. दंडाची रक्कमही तो तात्काळ वसूल करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अशा वाहन मालकाच्या घरी जाऊन त्याला नोटीस बजावून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत समुपदेशनही वाहतूक पोलिसांकडून केले जाणार आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर फेब्रुवारी २०१९ पासून ई चलान प्रक्रीयेद्वारे दंड आकारणी केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ दरम्यान प्रलंबित ई चलान संदर्भात ठाणे शहर वाहतूक शाखेने १८ उपविभागांमार्फत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविली. या मोहीमेमुळे अगदी सेलेब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही आपल्या थकीत दंडाचा भरणा केला. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यामध्ये ठाणे वाहतूक शाखेने सहा कोटी २५ लाख रुपये वसूल करुन ते शासनाकडे जमा केले होते.
सध्या सामान्य नागरिकांसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. यातूनच वाहतूकीच्या नियमांचे मोठया प्रमाणात उल्लंघन होत आहे. काही निर्ढावलेल्या वाहन चालकांनी वारंवार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध दहा हजारांपेक्षा जास्त दंड प्रलंबित आहे. अशा बेदरकार चालकांचा प्रलंबित दंड वसूलीसाठीच ही विशेष दंड वसूलीची मोहीम सुरु केल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितले. यामध्ये ठाणे आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेली वाहने आहेत. यात एमएच शून्य चार (ठाणे) ही तीन हजार १०५ तर एमएच शून्य पाच (कल्याण) या नोंदणीची ३४६ अशा एकूण तीन हजार ४५१ वाहनांवर दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक दंड प्रलंबित आहे. त्यापैकी एक हजार २६९ वाहन मालक हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी आहेत.
* ज्या एक हजार २६९ वाहन धारकांचे पत्ते ठाणे आयुक्तालयातील आहेत, त्यांचे वाहतुक उपविभागनिहाय वर्गीकरण केले आहे. संबंधितत वाहन मालकांच्या घरी प्रलंबित दंडाची रक्कम भरण्याबाबतची नोटीस घेऊन आता वाहतूक शाखेचा कर्मचारी धडकणार आहे.
* अनेक वाहनमालकांना त्यांच्या वाहनावर प्रलंबित चलान माहीत नसते. काहींना याची माहिती असूनही ते पुन्हा वाहतूक नियंमांचे उल्लंघन करतात. वरीलपैकी दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण्याची नोटीसही तो बजावणार आहे. दंडाची रक्कमही तो तात्काळ वसूल करणार आहे.
* आॅनलाईनही भरता येणार दंडाची रक्कम-
थकित दंडाची रक्कम आॅनलाईनद्वारे वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा पेटीएम अॅप किंवा वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाकडीत ई चलान मशिनवर अथवा जवळच्या वाहतूक चौकीवरही प्रत्यक्ष जाऊन भरावे असे आवाहन वाहतुक शाखेने केले आहे.