बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस उगारणार कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:18 PM2021-10-19T15:18:47+5:302021-10-19T15:21:44+5:30
जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे रिक्षा कशाही प्रकारे उभ्या करणे अशा वेगवेगळया प्रकारे बेशिस्तीचे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे रिक्षा कशाही प्रकारे उभ्या करणे अशा वेगवेगळया प्रकारे बेशिस्तीचे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. सोमवारी घेतलेल्या रिक्षा संघटनांच्या बैठकीमध्ये उपायुक्तांनी हा इशारा दिला.
ठाणे वाहतुक नियंत्रण शाखेच्या पुढाकारातून २० आॅक्टोंबर २०२१ रोजी पासून वाहतूक शाखेसह ठाणे नगर पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त कारवाईतून नियमभंग करणाºया रिक्षा चालकांवर नागरिकांच्या सुखद आणि जलद प्रवासासाठी कारवाईची ही मोहीम राबविली जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानक पश्चिमेकडील परिसरात रिक्षा चालक हे बेशिस्त पध्दतीने रिक्षा उभ्या करु न प्रवासी वाहतुक करतात. त्यामुळे त्या परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी येतात. अनेक रिक्षा चालक हे जादा प्रवासी भरणे, जास्त भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे, गणवेश न घालणे, बॅच न वापरणे असे अनेक नियमभंग करीत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळेच कारवाईची ही मोहीम सुरु करण्यापूर्वी १८ आॅक्टोबर रोजी रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत वाहतूक शाखेच्या उपायुक्तांच्या कार्यालयात रिक्षा संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. यामध्ये ठाण्यातील विविध भागातील रिक्षा युनियनचे २२ पदाधिकारी उपस्थित होते. नियमाप्रमाणे सर्व रिक्षा चालकांनी लायसन्स, परिमट, बॅच वापरणे सक्तीचे असल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
रिक्षा चालकांसाठी पांढरा गणवेश शिवण्यासाठी ३० आॅक्टोंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर १ नोव्हेंबर पासून मात्र गणवेशाचीही कारवाई केली जाणार आहे. इतर नियमभंगाबाबत २० आॅक्टोंबरपासून कडक कारवाई केली जाणार असल्याचे या बैठकीमध्ये उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
‘‘नागरीकांनीही रिक्षामध्ये प्रवास करण्यापूर्वी रांगेत उभे राहून प्रवासाला सुरुवात करावी. नियमबाहय जादा प्रवासी असलेल्या रिक्षामध्ये बसू नये. जादा भाडे आकारणी केल्यास वाहतुक शाखेकडे तक्रार करावी.
बाळासाहेब पाटील,पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर