ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 04:37 PM2021-11-09T16:37:06+5:302021-11-09T16:38:53+5:30

एसटी कर्मचारी गेल्या १३ दिवसापासून संप करत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे.

tragedy of passengers due to ST strike in Thane | ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

Next

ठाणे:एसटी कर्मचारी गेल्या १३ दिवसापासून संप करत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे. प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत तर काही प्रवासी हे गावावरून आले आहेत. एसटी वाहतूक बंद असल्याने व त्याला शहरातील इतर माहिती नसल्याने त्यामुळे त्यांची देखील फरफट होत आहे. दिवाळीच्या काळात हा संप पुकारल्याने एसटीने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. 

जा प्रवाशांनी तिकिटाचे ऑनलाइन नोंदणी केली होती, त्या प्रवाशांना पूर्वसूचना न दिल्याने ते प्रवासी देखील बस डेपो परिसरात फेर्‍या मारताना दिसत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलनिकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दोन दिवसांपासून कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या संपात महाराष्ट्रातील सर्व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून कोणी राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले. कोर्टाच्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये. अन्यथा कारवाई करावी लागेल, असेही परब यांनी म्हटले. दिवाळीच्या काळात संप असल्याने प्रवाशांना याचा मोठा  फटका बसला आहे. त्यामुळे हा संप कधी संपला आणि प्रवाशांची वाहतूक कधी सुरळीत होईल याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष आहे.
 

Web Title: tragedy of passengers due to ST strike in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.