रुळांची पाहणी करताना रेल्वे अधिकाऱ्याचा लोकलच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:20 PM2019-07-31T18:20:27+5:302019-07-31T18:21:15+5:30
राय यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले
डोंबिवली - कल्याण येथील पत्री पुलानजीक रेल्वे रुळांचे पाहणी करताना विमलकुमार राय या विभागीय अभियंत्याचा रेल्वे लोकलच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. मात्र, अपघातात राय यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राय यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, राय यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी माहिती दिली. रुक्मिणी बाई हॉस्पिटलमध्ये राय यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
बुधवार 31 जून रोजी 16.45 वा. चे सुमारास कल्याण पत्री पूलजवळ किमी 51.600 ते 51.700 दरम्यान अप स्लो ट्रॅक येथे कल्याण डिव्हिजनचे ADEN विमल राय 40 वर्षे ट्रॅक तपासणी करत असताना अप लोकल K 88 ही तेथे आली. सोबतचे ट्रेकमन प्रकाश बागडे यांनी त्यांना बाजूला होण्यासाठी आवाज दिला पण त्या ट्रॅकमधून बाजूला जात असताना त्यांच्या डोक्यास पाठीमागे सदर लोकल धडकल्याने ते जखमी झाल्याने fortis हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे त्यांना दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण येथे आणण्यात आला आहे. PSI चव्हाण व स्टाफचे मदतीने पुढील कार्यवाही करत आहोत. ADR नं.199/19 प्रमाणे दाखल करण्यात येत आहे.
ए. एस. बारटक्के,
वपोनि, कल्याण रे पो ठाणे
रेल्वे अधिकाऱ्याचा कल्याणमध्ये अपघातhttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 31, 2019