जिल्ह्यातील युवकांना एनडीआरएफचे प्रशिक्षण, नेहरू युवक केंद्राचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:33 AM2019-08-13T01:33:13+5:302019-08-13T01:33:43+5:30
युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन एनडीआरएफसोबत मदतकार्य करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १८ ते २८ वयोगटांतील प्रत्येक तालुक्यातील ३० युवक व युवतींना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे : युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन एनडीआरएफसोबत मदतकार्य करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १८ ते २८ वयोगटांतील प्रत्येक तालुक्यातील ३० युवक व युवतींना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अंतर्गत नेहरू युवा केंद्र ठाणे, यूएनडीपी, यूएनव्ही इंडिया यांच्या सहकार्याने दिले जाणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असून इच्छुक युवकांनी वेळीच संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
देशात नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अचानक येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला स्थानिकांना हिमतीने सज्ज राहावे लागते. या नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होत आहे.
दरवर्षी सातत्याने येणाºया आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाºया आपत्तींना तोंड देण्यासाठी, अज्ञान तसेच माहितीचा अभाव यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी, कमीतकमी जीवित व वित्तहानी होईल, याची खात्री करण्यासाठी, आपत्तीला सहज बळी पडणाºया वर्गाचे रक्षण करण्यासाठी आता युवकांना स्थानिक पातळीवर हे प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
निवडीसाठी हे असणार पात्रता निकष
कोणत्याही आपत्तीच्या वेळी पहिल्यांदा प्रतिसाद म्हणून काम करू इच्छिणाºया ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ३० युवकयुवतींची या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात येणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी ज्यांचे वय १८ ते २८ वर्षे आहे, अशा युवकांसाठी हे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त असला पाहिजे. किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सहा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन भविष्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच नेहरू युवा केंद्र कार्यालयासोबत काम करू इच्छिणाºया युवकांनी या प्रशिक्षणवर्गासाठी नोंदणी करण्याचे आवाहन युनायटेड नेशन स्वयंसेवक तथा जिल्हा युवा समन्वयक यांनी केले आहे. यासाठी इच्छुकांनी १५ आॅगस्टपर्यंत ठाणे येथील नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.