वेदनारहित शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:54 PM2019-07-13T23:54:11+5:302019-07-13T23:54:14+5:30

वैद्यकशास्त्रात सुरू असलेल्या नवनवीन संशोधनांमुळे उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत.

Transcript of Robotics Techniques for Painless Painless Surgery | वेदनारहित शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा उतारा

वेदनारहित शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा उतारा

Next

- मुरलीधर भवार

कल्याण : वैद्यकशास्त्रात सुरू असलेल्या नवनवीन संशोधनांमुळे उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. सध्या रोबोटिक सर्जरी हा पर्याय या क्षेत्रातील सर्वात चर्चेचा विषय आहे. डॉक्टरांच्या उपस्थितीत होणारी रोबोटिक सर्जरी अचूक आणि कमी वेदना देणारी असल्यामुळे रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. हे तंत्रज्ञान महागडे आहे, मात्र भविष्यात ते आर्थिकदृष्ट्या आवाक्यात येऊ न अनेक क्लिष्ट शस्त्रक्रियांमध्ये होणाऱ्या मानवी चुका टळून जीव वाचतील. कर्करोगावरील शस्त्रक्रियांमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा विश्वास कॅन्सर सर्जन डॉ. अनिल हेरूर यांनी व्यक्त केला आहे.
रोबो-लॅप सर्जरीविषयी एका बड्या रुग्णालयात प्रात्यक्षिक शिबिर डॉ. हेरूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिरात बांगलादेशमधील ढाका येथील सरकारी रुग्णालयातील अनुभवी सर्जन सहभागी झाले होते. कॅन्सर सर्जरीत मुंबई आणि उपनगरांत टॉपटेनच्या यादीत डॉ. हेरूर यांचे नाव गणले जाते. त्यांनी या शिबिरात कॅन्सरवरील रोबोटिक सर्जरीविषयी माहिती दिली. डॉ. हेरूर म्हणाले की, रुग्णावर सर्जरी करताना त्याला वेदना होणार नाहीत, यासाठी विविध शोध लागले. त्याचा वापर सुरू झाला. लहानशा दुर्बिणीद्वारे सर्जरीच्या ठिकाणी छिद्र करून सर्जरी केली जाते. त्याच्या पुढचे पाऊल रोबोटिक सर्जरी आहे. अमेरिकेत प्रथम रोबोटिक सर्जरीची कल्पना सुचली. आखाती देशांतील युद्धातील सैनिकांवर सर्जरी करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका यांची कमतरता असल्याने रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुचवला गेला
होता.
रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जरी होणारा भाग आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसतो. ती जागा अत्यंत मॅग्निफाइड करता येते. तसेच एक स्टेबल प्लॅटफॉर्म मिळतो. हातपाय कापत असेल तर सर्जरी चुकू शकते; मात्र रोबोटिकमध्ये थोडीही हालचाल झाल्यास शस्त्रक्रिया थांबते.
>सर्जरीचे तंत्रज्ञान महागडे
रोबोटिक सर्जरीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसतो, हा गैरसमज असून डॉक्टरने सर्जरीतून डोके जरी बाहेर काढले, तरी सर्जरीची प्रक्रिया रोबो बंद करतो. रोबोटिक सर्जरीचे तंत्रज्ञान महागडे आहे. विकसनशील देशांत ते परवडणारे नाही. तरीदेखील मेट्रो सिटीत त्याचा वापर सुरू झालेला आहे.मोबाइलप्रमाणेच रोबोटिक सर्जरीचे हे तंत्रज्ञानही स्वस्त होऊ शकते, असा विश्वास डॉ. हेरूर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Transcript of Robotics Techniques for Painless Painless Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.