ठाणे पालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली; डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:01 PM2020-06-23T23:01:05+5:302020-06-23T23:11:17+5:30
तीन महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर ठाणे पालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा दिवसभर होती.अखेर त्यांच्या बदलीचे आदेश देखील आले असून त्यांच्या जागी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे : उल्हासनगर, मिराभाईंदर तसेच नवी मुंबई महापालिकाच्या आयुक्तांसोबतच ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर ठाणे पालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा दिवसभर होती.अखेर त्यांच्या बदलीचे आदेश देखील आले असून त्यांच्या जागी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शर्मा हे प्रशिक्षण करून आल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाले होते. ते 2005 च्या बॅचचे आयएएस असून ते पुण्याच्या एज्युकेशन विभागाचे आयुक्त आहेत. ठाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून सिंघल यांच्या कार्यकाळात यावर नियंत्रण झाले नसल्याने देखील ही बदली झाली असल्याची चर्चा आहे.
ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तडकाफडकी रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या जागी विजय सिंघल यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यात अवघ्या तीन महिन्यात मंगळवारी त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बिपीन शर्मा यांची आयुक्त पदी वर्णी लागली आहे.
आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीचे वृत्त शहरात पसरताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरु झाली.
आणखी बातम्या...
वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य