कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालिका आयुक्तांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:51 AM2018-03-17T06:51:15+5:302018-03-17T06:51:15+5:30
कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांबाबत केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. गडकरींच्या नाराजीची दखल घेत येथील महापालिकेचे आयुक्त पी.वेलारसू यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.
मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांबाबत केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली
होती. गडकरींच्या नाराजीची दखल घेत येथील महापालिकेचे आयुक्त पी.वेलारसू यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. राज्य
रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर वेलारसू यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर मत्सव्यवसाय आयुक्त असलेले जी.एम.बोडके यांची कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
जी. बी. पाटील हे उल्हासनगर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत त्या ठिकाणी महापालिका आयुक्त असलेले आर.व्ही. निंबाळकर हे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जात आहेत. कामगार विभागाचे सहसचिव अरुण विधळे हे नवे मत्सव्यवसाय आयुक्त असतील.
औरंगाबादचे शहर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना कचरा आंदोलनप्रकरणी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले असतानाच आज तेथील महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली केली. मुगळीकर हे आता मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे नवे सदस्य सचिव असतील. औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी तूर्त कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.