उल्हासनगरात तृतीयपंथीचा रंगला फॅशन शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:07 PM2020-12-20T17:07:48+5:302020-12-20T17:07:55+5:30

transgender fashion show शहरातील शहाड फाटक व कॅम्प नं-४ ओटी सेक्शन परिसरात किन्नरांची संख्या मोठया प्रमाणात असून यामध्ये उच्चशिक्षितांची संख्याही लक्षणीय आहे.

transgender fashion show in Ulhasnagar | उल्हासनगरात तृतीयपंथीचा रंगला फॅशन शो

उल्हासनगरात तृतीयपंथीचा रंगला फॅशन शो

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर : तृतीयपंथीया मधील सुप्त गुण बाहेर काढून त्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी शहरातील रिजेन्सी हॉल मध्ये फैशन व डान्स शोचे आयोजन करण्यात आले. तब्बल ५० जणांनी यामध्ये भाग घेतला असून उपस्थिती मोठया प्रमाणात असल्याची माहिती आयोजक नगरसेविका रेखा ठाकूर यांनी दिली. 

शहरातील शहाड फाटक व कॅम्प नं-४ ओटी सेक्शन परिसरात किन्नरांची संख्या मोठया प्रमाणात असून यामध्ये उच्चशिक्षितांची संख्याही लक्षणीय आहे. वर्षभर त्यांच्या वतीने विविध उपक्रम राबविला जातो. कोरोना काळात त्यांच्या मनावर आलेली मरगळ दूर सारण्यासाठी वान्या फाऊंडेशन व किन्नर अस्मिता सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन कॅम्प नं-३ येथील रिजेन्सी हॉल मध्ये शुक्रवारी फैशन व डान्स शोचे आयोजन केले. कार्यक्रमाला शहरासह भिवंडी, अंबरनाथ, कल्याण आदी शहरातूनमोठ्या प्रमाणात तृतीयपंथी आले होते. तर ५० पेक्षा जास्त जणांनी कार्यक्रमात सहभागी नोंदवून धमाल उडून दिली. फैशन मध्ये बिलो केने याने प्रथम तर बेलो केने, सन्नि मोरे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर डान्स मध्ये गौरी केने याने प्रथम व रोहित शिंदे, लक्खा केने यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 तृतीयपंथी हे समाजाचे घटक असून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांनी बदलायला हवा. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वान्या फाऊंडेशन व किन्नर अस्मिता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांच्यातील सुप्त गुणांचा देशाला फायदा होण्यासाठी विविध सामाजिक संस्थेसह राजकीय पक्ष, शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा व नगरसेविका रेखा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात शासनाने कोरोना काळात घालून दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. 

Web Title: transgender fashion show in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.