भाषांतर ही भिन्न संस्कृतींना जोडण्याची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:02 AM2019-05-27T01:02:58+5:302019-05-27T01:03:01+5:30

भाषांतर ही भाषेची तोडमोड नाही, तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे.

Translation is the art of combining different cultures | भाषांतर ही भिन्न संस्कृतींना जोडण्याची कला

भाषांतर ही भिन्न संस्कृतींना जोडण्याची कला

googlenewsNext

ठाणे : भाषांतर ही भाषेची तोडमोड नाही, तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे. म्हणून, एका अर्थाने व्यापकतेकडे जाणे आहे, हे आपण समजून घ्यावे. देश स्वतंत्र झाल्यावर सर्व विद्यापीठे, प्राध्यापक, लेखक यांनी भाषांतराचे कार्य सुरू केले असते, तर आजचा भारत वेगळा असता, असे मत ज्येष्ठ प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी मांडले.
‘वी नीड यू सोसायटी’ या संस्थेतर्फे २० वर्षे परदेशी भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरित करून पाश्चिमात्य साहित्य व संस्कृतीचा परिचय करून देणाºया ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाला प्रबोधन पुरस्कार देण्यात आला. शनिवारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. भटकळ म्हणाले की, आपल्याकडे सानेगुरु जींनी अनेक उत्तम ग्रंथ व साहित्याचा सहजसोपा अनुवाद केला आहे. यावर किमान तीन ते चार पिढ्या समृद्ध झाल्या आहेत. याच हेतूने सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र सुरू केले आहे. यात सहभागी होण्याचे प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अनुवाद हे कार्य केवळ तुम्हाला अन्य भाषा येतात म्हणून करता येणारे शास्त्र नाही. त्यासाठी आंतरिक इच्छा व ओढ लागते. नेमका आशय समजावा लागतो. त्यामुळे केलेल्या भाषांतराची ‘स्क्रुटिनी’ महत्त्वाची असते. यामुळे चुकीचे भाषांतर होत नाही किंवा ते सुधारणे शक्य होते. उदा. गिरीश कर्नाड यांच्या एका पुस्तकाचे भाषांतर करताना ‘कॅटरॅक्ट’ या शब्दाचे भाषांतर मोतीबिंदू केले, पण आशयानुसार ते ‘धबधबा’ असायला हवे होते. ही काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. हा पुरस्कार संपादिका सुनंदा महाजन व अनघा भट यांनी स्वीकारला. त्या म्हणाल्या की, हा भाषांतराचा घाट मराठी समाज अधिक समृद्ध होण्यासाठी दिवंगत विद्यासागर महाजन यांनी घातला. वीस वर्षे तो अथकपणे सुरू आहे. वाचकांचा कायम पाठिंबा व सूचना तसेच सकारात्मक अभिप्राय आमची ताकद वाढवतो.
>मान्यवरांकडून कथांचे अभिवाचन : कार्यक्र मात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी फ्रेंच कथेचे, श्रीरंग खरावकर यांनी मेक्सिकन व वासंती वर्तक या दोन्ही मान्यवरांनी एकत्रित एका जर्मन कथेचे अभिवाचन केले. ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाचा परिचय नचिकेत कुलकर्णी यांनी, ‘वी नीड यू’च्या कार्याचा परिचय संजीव साने, पुरस्काराची भूमिका जयंत कुलकर्णी व कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.

Web Title: Translation is the art of combining different cultures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.