अवैध वाहतुकीवर कारवाईत परिवहन प्रशासन नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:59 AM2018-07-24T02:59:09+5:302018-07-24T02:59:32+5:30

लेखापरीक्षण अहवालात ठपका; पाच वर्षांत मार्गतपासणी नाहीच

Transport administration denied action in illegal transport | अवैध वाहतुकीवर कारवाईत परिवहन प्रशासन नापास

अवैध वाहतुकीवर कारवाईत परिवहन प्रशासन नापास

Next

ठाणे : ठाण्यातील अवैध प्रवासी बस वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन समितीच्या बैठकीत वारंवार चर्चा झाल्या आहेत. या बसवर कारवाईचे आश्वासनसुद्धा प्रशासनाने दिले आहे. परंतु,या ही कारवाई करण्यात ते कमी पडत असल्याचा ठपका लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.
ठाणे परिवहन सेवेचा २०१५-१६ चा लेखा परीक्षण अहवाल नुकताच सादर झाला. यामध्ये खाजगी बसवरील कारवाईबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तसेच विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने किमान आठवड्यातून एक दिवस तरी खास तिकीटतपासणी कार्यक्रमाचे आयोजन करावे असे नमूद केले आहे. मागील काही वर्षांचा अभ्यास केला असता, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाºया दंडातसुद्धा जवळ जवळ १ लाखांची घट झाली आहे. शिवाय खाजगी बसवर कारवाई करण्यासाठी परिवहन प्रशासनाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून ती होत नसल्याचे लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील पाच वर्षात विशेष मार्गतपासणी मोहीम राबविलीच नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. परिवहन प्रशासनाकडून या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचेही सांगण्यात आले आहे. परिवहन सेवेची सध्याची आर्थिक स्थिती खालावली असल्याने अवैध खाजगी वाहतुकीवर कारवाई करणे अपेक्षित असतांनाही ती होत नसेल तर त्याचा परिवहनच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच व्यवस्थापकांनी सुचविलेल्या मोहिमा राबविणे यापुढे गरजेचे असेल, असेही यात नमूद आहे.

जप्त वाहनांमुळे कारवाई थंडावली
गेल्या काही महिन्यात परिवहन मार्फत अवैध्य खाजगी वाहतुकीवर कारवाईसाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार काही बसवर दंडाची कारवाई, तर काही जप्त केल्या आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस सहकार्य करीत असल्याचेही परिवहनने स्पष्ट केले आहे. परंतु, जप्त केलेली वाहने लावायची कुठे असा पेच असल्याने ही कारवाई करणे सद्यस्थितीत कठीण जात असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Transport administration denied action in illegal transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.