परिवहन समितीने सादर केला ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प; बेस्ट प्रमाणे परिवहनचे दर समान करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:44 PM2021-02-05T19:44:25+5:302021-02-05T19:44:33+5:30
परिवहन प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प समितीने केला ४ कोटी ४१ लाखांनी केला कमी
ठाणे: ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या ४५८.१३ कोटींच्या अर्थसंकल्पानंतर त्यावर परिवहन समितीने चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी समितीने ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. परिवहन प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ४ कोटी ४१ लाखांनी कमी करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. परंतु यामध्ये परिवहनने पालिकेकडून अनुदानात वाढ केल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे परिवहनचे तिकीट दर बेस्टधर्तीवर समान करण्याची हमी देखील या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. त्यासाठी पत्रव्यहाराही करण्यात येणार असल्याचे परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी स्पष्ट केले.
ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर त्यावर साधक बाधक चर्चा केल्यानंतर परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये परिवहन सेवेच्या इतर प्राधिकरणाचे किंबहुना बेस्टचे भाडे हे २५ रुपये असतांना तेच भाडे ठाणो परिवहन सेवेचे ८५ रुपये आहे. इतर भाडेही इतर प्राधिकरणापेक्षा अधिक आहे. त्यामुळे एमएमआरडीए प्राधिकरणात प्रवासी सेवा देणा:या विविध महापालिका परिवहन उपक्रमांचे भाडे समान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ५० मिडी बसेस घेण्यासाठी २३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु ही रक्कम पालिकेकडून अनुदानास्वरुपात मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ठाणो परिवहन सेवेत इलेक्ट्रीक बसेस दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून बेस्टमध्ये मुंबई आणि पुणे शहरामध्ये या बसेसकीरता ६० टक्के सबसीडी दिली जाते. त्यानुसार ठाणो परिवहन सेवेसही तशीच सबसीडी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेकडून २०१९-२० या वर्षातील १८ कोटीची देणी अद्याप शिल्लक असून यंदाच्या वर्षात ती रक्कम वाढणार असल्याने ती सर्वच रक्कम अनुदान स्वरुपात मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. परिवहन सेवेचे आगार विकास करतांना आनंद नगर, वागळे आगार, कोलशेत आगारांच्या विकासासाठी यापूर्वी २५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु परिवहन समितीने ही रक्कम देखील पालिकेकडून अनुदान स्वरुपात मागितली आहे.
परिवहन सेवेची कार्यक्षमता वाढावी व आर्थिक स्थिती बळकट व्हावी यासाठी अंदाजपत्रकात सुचविल्याप्रमाणो ठाणो महापालिकेकडून २०२०-२१ च्या सुधारीत अंदाजपत्रकात वाढीव १४ कोटी ८४ लाख तसेच २०२१-२२ या मुळ अंदाजपत्रकात महसुली कामाकरीता २०९.७७ कोटी व संचलन तुटीपोटी ९२ कोटी ६४लाख अशी ३०२ कोटी ४१ लाखांच्या अनुदानाची मागणी परिवहनने पालिकेकडे केली आहे.