बनावट विदेशी मद्याची वाहतूक: राज्य उत्पादन शुल्कच्या धाडीत २८ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 08:27 PM2020-11-23T20:27:26+5:302020-11-23T20:30:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दीपक बोर्डे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली पथकाने ...

Transport of counterfeit foreign liquor: Rs 28 lakh seized in state excise raid | बनावट विदेशी मद्याची वाहतूक: राज्य उत्पादन शुल्कच्या धाडीत २८ लाखांचा ऐवज जप्त

कल्याण शीळ रोडवर कारवाई

Next
ठळक मुद्देकल्याण शीळ रोडवर कारवाई टेम्पोसह एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दीपक बोर्डे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून विदेशी मद्यासह २८ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याला दोन दिवस उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा येथून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे डोंबिवलीचे निरीक्षक अनिल पवार, दुय्यम निरीक्षक मल्हारी होळ, विश्वजीत आभाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुनिल माळी, दीपक खडसे, दीपक दळवी आणि शिवराम जाखीरे आदींच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी सोनारपाडा येथील आर्या लॉजसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोाची तपासणी केली. त्यावेळी या वाहनातून १८० मिलीच्या १२०० बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यावेळी टेम्पोसह हे बनावट मद्य जप्त करुन दीपक याला या पथकाने अटक केली. यामध्ये तीन लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दीपक याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा दीवा रोडवरील उसरघर येथून हे विदेशी मद्य आणल्याची माहिती दिली. त्यानुसार उसरघर गावातील विट भट्टीजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या झडतीतून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा निर्मित मद्याच्या १८० मिलीच्या १६ हजार ५६० बाटल्या आणि ट्रक जप्त करण्यात आला. याठिकाणी २५ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील मुख्य आरोपी पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Transport of counterfeit foreign liquor: Rs 28 lakh seized in state excise raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.