पडघा गट सेना राखणार? उमेदवारांमध्ये होणार काँटे की टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:15 AM2017-12-11T06:15:33+5:302017-12-11T06:15:45+5:30

भिवंडी तालुक्यातील पडघा - कुरूंद जिल्हा परिषद गटात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (धमनिरपेक्ष) महायुतीच्या उमेदवार रूचिता पाटील व भाजपा, श्रमजीवी संघटना आरपीआय आघाडीच्या श्रेया गायकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे.

 Trapped group army? Candidates will be bitten by thorns | पडघा गट सेना राखणार? उमेदवारांमध्ये होणार काँटे की टक्कर

पडघा गट सेना राखणार? उमेदवारांमध्ये होणार काँटे की टक्कर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अनगाव: भिवंडी तालुक्यातील पडघा - कुरूंद जिल्हा परिषद गटात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (धमनिरपेक्ष) महायुतीच्या उमेदवार रूचिता पाटील व भाजपा, श्रमजीवी संघटना आरपीआय आघाडीच्या श्रेया गायकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. २० वर्ष हा गट शिवसेनेच्या ताब्यात असून सेना तो गड राखणार का नाही याची चर्चा सुरू आहे.
पूर्वीचा पडघा - बोरिवली जि.प. गट आता पडघा- कुरूंद गट नव्याने झाला आहे. या गटामधून तत्कालीन जि.प. सदस्य व शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रकाश पाटील, माजी सरपंच गंगूबाई शेलार हे विजयी झाले आहेत. त्यामुळे हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्यातून भाजपा विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्व नितीचा वापर करत आहे. आमदार, जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. यामुळे येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पडघा- कुरूंद गटात पडघा, कुरूंद, भोकरी, कुकसे, सापे, खाडवल, राहूर -देवली या सात ग्रामपंचायत व त्यामधील गावपाड्यांचा समावेश आहे. हा गट आघाडीने भाजपाला तर महायुतीने शिवसेनेला सोडला आहे. पडघा पंचायत समिती गण हा युतीने मनसेला सोडला आहे. या गटात शिवसेनेसह श्रमजीवी संघटनेची ताकद आहे. श्रमजीवीची मते ही निर्णायक ठरणार आहेत. भिवंडीतील सदस्य अगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवणार असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या भागाकडे लक्ष दिले आहे. साततत्याने प्रचारसभा घेत मतदारांशी संपर्क साधत आहेत.

मंत्र्यांच्या उपस्थितीने प्रचारामध्ये रंगत

आदिवासी विकासमत्री विष्णू सवरा यांनी दाभाड, अंबाडी, गणेशपुरी, मोहडूल येथे तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाभाड, कवाड, शेलार, पडघा, कोन, काल्हेर, अंबाडी गणात प्रचार केला. तर खासदार कपिल पाटील यांनी मोटारसायकलवरून प्रचारात सहभागी झाले होते. तर आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, महेश चौघुले यांनी सभा घेतल्या. दोन दिवसांपासून मंत्री प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

अपक्षांच्या ‘कपबशी’ निशाणीने मतदार संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : कपबशी आणि गोटीराम पवार हे विधानसभा निवडणुकीच्या काळात मुरबाड तालुक्यातील एक समीकरणच झाले होते. मात्र, आता कुडवली गटात जिल्हा परिषदेचे उमेदवार असलेले सुभाष गोटीराम पवार हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तर, दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी सुभाष हरिश्चंद्र पवार यांनी ‘कपबशी’ हीच निशाणी घेतल्याने राष्टÑवादीचे मतदार या एकाच नावामुळे संभ्रमात सापडले आहेत. ही निशाणी तसेच एकच नाव असलेल्या उमेदवारामुळे राष्ट्रवादीचे मतदान घटू शकते. तसेच अपक्ष उमेदवार कुडवली गटात आपले खाते उघडतात की काय, असे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर आ. गोटीराम पवार यांनी कपबशी निशाणी घेऊन आ. किसन कथोरे यांना जोरदार लढत दिली. पवार समर्थकांनी तेव्हा त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे थोड्याशा फरकाने गोटीराम पवार यांचा पराभव झाला. मात्र, गोटीराम पवार यांनी त्या वेळी घेतलेली कपबशी निशाणी ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावी, म्हणून तेव्हा घराघरांत कपबशीवाटप केली होती. त्यामुळे कपबशी म्हणजे गोटीराम पवार आणि गोटीराम पवार म्हणजे राष्टÑवादी असे समीकरण आहे. या निवडणुकीत गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार हे निवडणूक लढवत आहेत. याच नावाचा एक अपक्ष उमेदवारही रिंगणात असून त्याचे चिन्हही ‘कपबशी’ हेच आहे. या सगळ्यामुळे कपबशी निशाणी असलेला उमेदवार म्हणजे सुभाष पवार असा संभ्रम मतदारांमध्ये असून याचा परिणाम मतदानावर होतो का, हे १३ डिसेंबरला कळेलच.

मुरबाड तालुक्यातील मतदार हे सुज्ञ आहेत. ते निशाणी पाहून मतदान करणार नाहीत, तर उमेदवार पाहून मतदान करतील.
- सुभाष गोटीराम पवार, उमेदवार, राष्टÑवादी-शिवसेना, कुडवली गट
मागील निवडणुकीत माजी आ. गोटीराम पवार यांनी ‘कपबशी’ या निशाणीवर आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यांना प्रचंड मतदान झाले होते. अपक्ष म्हणून लढताना मी देखील हेच चिन्ह घेतले आहे.
- सुभाष हरिश्चंद्र पवार, अपक्ष उमेदवार, कुडवली गट

Web Title:  Trapped group army? Candidates will be bitten by thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.