अभिनय कट्टयावर उलगडला कलाकारांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास, अजरामर कलाकृतीची रसिकांना आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:45 PM2018-02-05T15:45:16+5:302018-02-05T15:50:42+5:30
अभिनय कट्टयावर उलगडला कलाकारांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास उलगडला. यावेळी अजरामर कलाकृतीची रसिकांना आठवण करून दिली.
ठाणे : रविवारी अभिनय कट्ट्याचा ३६२ क्रमांकाचा कट्टा दिमाखात पार पडला ह्या वेळी विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कट्ट्याच्या कलाकारांचा चंदेरी दुनिये पर्यंतचा प्रवास. प्रथे प्रमाणे दीपप्रज्वलन पार पडले आणि त्याची जबाबदारी ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी स्नेहल यांनी पार पाडली.या नंतर सादररीकरणास सुरवात झाली ती अभिषेक सिंग याने केलेल्या एकपात्री पासून. अभिषेक ने स्वर्ग चित्रपटातील एक प्रसंगाद्वारे आपली अदाकारी सादर केली तर बालकलाकार आदित्य म्हस्के याने काँप्युटर गेम्स या एकपात्री द्वारे लोकांच्या टाळ्या लुटल्या. कल्पेश डुकरे याने वऱ्हाड निघालय लंडनला या एकपात्री द्वारे वऱ्हाड या अजरामर कलाकृतीची आठवण रसिकांना करून दिली
कलाकृतीच्या सादरीकरणामध्ये पुढे सुरू झाले नृत्याभिनय. हे सदर प्रथमतः स्वप्नजा जाधव यांनी सांग ना रे तू बाबा यावर नृत्य सादर करत बाबांचे आणि मुलींच अनोखे नाते मांडले आणि रसिकांची मने जिंकली.रोशनी उबरसाडे हिने निबोंणीच्या झाडामागे यावर अभिनयाद्वारे नृत्य करत ताल धरला. शुभांगी भालेकर यांनी मे तुलसी तेरे आंगन की,तर प्रतिभा घाडगे यांनी विठुरायाला वंदन करत.. रखुमाई रखुमाई या भक्ती गीतावर ताल धरला आणि वातावरण भक्तिमय करत रसिकांना विठूचरणी लीन केले.कट्ट्याच्या उत्तरार्धात प्रमुख कार्यक्रम म्हणजे अभिनय कट्ट्याच्या कलाकारांचा चंदेरी दुनियेपर्यंतचा प्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला.पूर्वप्रथम कट्ट्याचे सर्वेसर्वा किरण नाकती यांनी रसिकांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. उंच माझा झोका, अरुंधती, गंध फुलांचा गेला सांगून, क्राईम डायरी, लक्ष्य , गणपती बाप्पा मोरया, का रे दुरावा, जिंदगी नॉट आऊट,अशा सुमारे २३ मालिका तसेच झालाय दिमाख खराब, स्लॅमबुक, सिंड्रेला, मेमरी कार्ड, सध्या गाजत असलेली "दिशा पात्र ची जाहिरात अशा विविध माध्यमांत काम करणाऱ्या अभिनय कट्ट्याच्या अथर्वने आजपर्यंत चांगलं यश मिळवलं आहे. व हा प्रयत्न सुरूच आहे. “सिंड्रेला” या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेले रुपेश बने, यशस्वी वेंगुर्लेकर व इतर ९५ % पात्रं सुद्धा अभिनय कट्ट्याचीच होती. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन किरण नाकती यांनी केले होते. “तलाव” या चित्रपटात प्रमुख नायिका साकारणारी, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "यंटम" या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेला "अक्षय थोरात" मार्चमध्ये प्रदर्शित होणारा 'मेमरी कार्ड" या चित्रपटातील आदित्य नाकतीची महत्वपूर्ण भूमिका. अशा अनेक चित्रपटात अभिनय कट्टयाच्या कलाकारांना अभिनय कट्ट्यावर केलेल्या सादरीकरणांच्या गुणवत्तेनुसार काम करण्याची संधी मिळू लागली आहे. आजपर्यंत शेकडो अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी शॉर्टफिल्म , अॅडफिल्म्, मालीका, चित्रपटात काम केले आहे व नव्याने काम करीत आहेत . अलीकडे जास्तीत जास्त प्रोडक्शन हाऊसेस व कास्टिंग डायरेक्टरअभिनय कट्ट्याच्या कलाकारांना प्रथम पसंती देत आहेत. या नंतर बापमाणुस, घाडगे अँड सुन ,राधा प्रेम रंगी रंगली, विठुमाऊली, फ्रेशर्स व इतर अनेक मराठी मालिकेमधील तर क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया व इतर हिंदी मालिकेतील कट्ट्याच्या कलाकारांनी केलेली कामे प्रोजेक्टरद्वारे रसिकांनी अनुभवली. कट्टयावर आपली कला सादर करता करता पडद्यावर आपली अदाकारी सादर करून रसिकांचे मनोरंजन करतानाचे अनुभव कलाकारांनी प्रेक्षाकांसमोर कथन केले. या मध्ये कदिर शेख, संकेत देशपांडे, गणेश गायकवाड, आदित्य नाकती, राजन मयेकर, निलेश पाटील, मयुरेश जोशी, सुरज परब यांचा समावेश होता. आपले मनोगत व्यक्त करताना "अभिनय कट्टा हा कलाकारांना मोठ्या पडद्याचे आपले स्वप्न साकार करण्याचा राजमार्ग " असल्याचे प्रतिपादन संकेत देशपांडे यांनी केले. सदर कट्ट्याचे निवेदन कलाकार गणेश गायकवाड याने केले.