निधन पावलेल्या रुग्णावर आयसीयूत उपचार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार; जितेंद्र आव्हाडांची खंत 

By अजित मांडके | Published: August 11, 2023 12:16 PM2023-08-11T12:16:30+5:302023-08-11T12:20:24+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला आयसीयू ...

Treatment of deceased patient in ICU in thane Jitendra Awhad's regret | निधन पावलेल्या रुग्णावर आयसीयूत उपचार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार; जितेंद्र आव्हाडांची खंत 

निधन पावलेल्या रुग्णावर आयसीयूत उपचार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार; जितेंद्र आव्हाडांची खंत 

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला आयसीयू विभागात नेण्यात येते. तेथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना, दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकत आहेत. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. याबाबत खंत व्यक्त करत, यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच. पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो. असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

गुरुवारी दिवस भरात कळवा रुग्णालयात ५ रुग्ण दगावल्याने त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. त्यातच आव्हाड यांनी केलेल्या ट्विट मध्ये त्यांना गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील कळवा रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या असे म्हटले आहे. बुधवारी एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून ते सुन्न होऊन तळपायाची आग मस्तकात गेल्याचे म्हटले आहे. त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले.तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते. असा आरोप केला आहे. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली. मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना, दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. 

या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत, डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात  सुरू या खंत व्यक्त करत या गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द त्यांनी दिला आहे असेही शेवटी म्हटले आहे.

Web Title: Treatment of deceased patient in ICU in thane Jitendra Awhad's regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.