उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून प्रभाग समिती क्रं-४ ची झाडाझडती; अनेक कामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 03:35 PM2021-03-21T15:35:59+5:302021-03-21T15:36:11+5:30
महापालिका प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी प्रभागातील विविध विकास कामाबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा केला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं- ४ च्या सभापती अंजली साळवे यांच्या विनंतीनुसार आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी भेट घेऊन विकास कामाची माहिती घेतली. तसेच सभापती अंजली साळवे यांनी सुचविलेल्या अनेक विकास कामाला हिरवा कंदील दिला असून यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे उपस्थित होते.
महापालिका प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी प्रभागातील विविध विकास कामाबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा केला. अखेर सभापतींच्या विनंतीला मान देऊन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शुक्रवारी समितीला भेट देऊन सभापती अंजली साळवे, महापालिका अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून विकास कामाचा आढावा घेतला. बैठकीला वैधकीय अधिकारी डॉ दीपक पगारे, डॉ अमृता मोरे, बांधकाम विभागाचे अधिकारी अश्विनी अहुजा, पाणी पुरवठा विभागाचे बी.एस पाटील, सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे आदीजन उपस्थित होते. यावेळी सभापती अंजली साळवे यांनी प्रभागातील अनेक विकास कामाची माहिती आयुक्तांना देऊन प्रलंबित असलेल्या कामाची माहिती दिली.
शहरातील कॅम्प नं-५, दुर्गापाडा येथील आरोग्य केंद्राला सर्व सुविधा व साहित्य देण्याची मागणी करण्यात आली. प्रभाग क्र-१८ येथील आरोग्य केंद्र आठवढ्यातील ५ दिवसा ऐवजी ६ दिवस सुरू करा, कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी येथील जीर्ण झ्हालेला रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी अर्थसंकल्पात ७० लाखाची तरतूद करणे, प्रभाग समिती क्रं-४ अंतर्गत सर्व उद्यानाच्या देखभाली व सुरक्षा रक्षक व माळी नियुक्त करणे. पाणी पुरवठाची वेळ नियमित करणे व दैनंदिन वेळपत्रक सर्व नगरसेवकांना कळवणे. पाणी गळती व देखभाल वेळेवर होण्याकरिता योग्य ठेकेदार नेमणूक करणे, सर्व जलकुंभांना संरक्षण भिंत व गेट लावणे, बंद पडलेल्या बोरवेल सुरु करणे, व उद्यानात नवीन बोरवेल टाकणे, कॅम्प क्र ५ येथिल डम्पिंग ग्रॉऊंडचे हस्तांतरची प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
आयुक्तांची सकारात्मक भूमिका- अंजली साळवे
केबिन आयुक्त म्हणून टीका होत असलेले आयुक्त डॉ राजा दयानिधी शहरातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालय बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यातूनच त्यांनी शहर पूर्वेतील प्रभाग समितो क्रं-४ च्या अधिकाऱ्याची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. आयुक्तांच्या सकारात्मक अंदाजमुळे प्रभागातील विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.