भिवंडीत झाड कोसळले, वाहनांचे नुकसान
By नितीन पंडित | Updated: July 1, 2023 13:35 IST2023-07-01T13:34:55+5:302023-07-01T13:35:12+5:30
दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी या भागात रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या कार व दुचाकीवर झाड कोसळल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

भिवंडीत झाड कोसळले, वाहनांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडीत मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे झाड ३० ते ४० वर्ष जुने चिंचेचे महाकाय झाड कोसळल्याची घटना शनिवारी पहाटे अजय नगर परिसरात घडली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी या भागात रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या कार व दुचाकीवर झाड कोसळल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हे झाड रस्त्याच्या मधोमध आडवे पडल्याने काही काळ रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती अग्निशामक दलाल मिळतात अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून झाड बाजूला करण्यात आले आहे.