सोशल मीडियावरील चॅलेंजेसचा ट्रेण्ड पडू शकतो महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 12:01 AM2020-10-02T00:01:25+5:302020-10-02T00:01:46+5:30

कपल, बापलेक चॅलेंज : फोटोंचा गैरवापर होण्याची भीती

The trend of challenges on social media can be expensive | सोशल मीडियावरील चॅलेंजेसचा ट्रेण्ड पडू शकतो महागात

सोशल मीडियावरील चॅलेंजेसचा ट्रेण्ड पडू शकतो महागात

Next

स्रेहा पावसकर ।

ठाणे : सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्यांची काही कमी नाही. या सोशल मीडियावर कायम काहीतरी नवीन ट्रेण्ड येत असतो आणि तो तितकाच हिटही होतो. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक चॅलेंजेस फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर पाहायला मिळाली. अनलॉकनंतर अनेकजण पुन्हा कामात व्यस्त झाल्याने मागील काही दिवसांत या चॅलेंजेसची क्रेझ काहीशी कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या चॅलेंजेसचा ट्रेण्ड आला असून कपल चॅलेंज, बापलेक चॅलेंज, फॅमिली चॅलेंज अशी अनेकविध चॅलेंजेस घेऊन तसे फोटोही नेटकऱ्यांकडून पोस्ट केले जात आहेत. मात्र, या फोटोंचा गैरवापर होण्याची भीती असल्याने पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊनमुळे बरेच जण वर्क फ्रॉॅम होम होते. अनलॉकनंतर काही कार्यालये, उद्योगधंदे सुरू झाले आहेत. मात्र,अजूनही सर्व कार्यालये सुरू झालेली नाहीत. अनेक जण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालवत आहेत. या सोशल मीडियावर काहीतरी नवा ट्रेण्ड अनुभवण्यास नेटकरी उत्सुक असतात.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर विविध ट्रेण्ड दिसले, अनेक चॅलेंजेस आले. जुन्या फोटोंना कमेंट करणे, १० ईअर्स चॅलेंज, सारी चॅलेंज, सोलो फोटो चॅलेंज, मदरहूड डेअर चॅलेंज, फिटनेस चॅलेंज, फॉरएव्हर प्रोफेशन चॅलेंज, डान्सिंग चॅलेंज असे एक ना अनेक चॅलेंजेस नेटकºयांनी एकमेकांना दिले आणि अनेकांनी ते एक्सेप्ट करत त्याचे फोटोही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केलेले पाहायला मिळाले. हे चॅलेंजेसचे फॅड मध्यंतरी कमी झाले होते. पुन्हा एकदा कपल, बापलेक चॅलेंज, फॅमिली चॅलेंजेस देऊन तसे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. तरुणवर्गच नाहीतर अगदी ज्येष्ठही फोटो शेअर करत आहेत.

असा होऊ शकतो गैरवापर
सोशल मीडिया विशेषत: फेसबुकने भारतातील निवडणुकांसाठी भाजपला पुरक अशी भूमिका घेतली, असा आरोप यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे या चॅलेंजेसमध्ये वापरण्यात येणाºया फोटोंच वापर एडिट करून बिहारसह आगामी काळात येणाºया निवडणुकांच्या जाहिराती व अन्य कारणांसाठी वापर होण्याची भीती किंवा पॉर्न क्लिप तयार करण्यासाठीही होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा पोस्ट टाळण्याचे आवाहन केले आहे. पुणे पोलिसांनी तर सावधानतेचा इशाराच दिला आहे.

Web Title: The trend of challenges on social media can be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे