आदिवासी शेतकºयांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:45 PM2017-07-26T23:45:40+5:302017-07-26T23:45:43+5:30

कल्याण तालुक्यातील कांबा-वाघेरापाडा येथील आदिवासी शेतकºयांनी शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

Tribal Farmer protest | आदिवासी शेतकºयांचा आंदोलनाचा इशारा

आदिवासी शेतकºयांचा आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

बिर्लागेट : कल्याण तालुक्यातील कांबा-वाघेरापाडा येथील आदिवासी शेतकºयांनी शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
कांबा वाघेरापाडा येथे आदिवासींची परंपरागत शेती आहे. दफनभूमीही तेथे आहे. आदिवासींची जमीन उल्हासनगरातील व्यापारी व इतरांनी खरेदी केली. त्याला आदिवासींनी विरोध केला. आदिवासींच्या वतीने परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल
गुप्ता हे २००४ पासून या अन्यायाविरुद्ध लढ देत आहेत. जमिनी परत मिळाव्यात, यासाठी सरकार दरबारी सर्वच पातळीवर तक्रारी केल्या आहेत.
मार्च २०१७ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार अनंत गाडगीळ यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता. परंतु, कल्याण प्रांताधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्यांना चुकीची व फसवणूक करणारी माहिती दिल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी आणि कल्याण प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांच्यावर कारवाई करावी व जमिनी परत द्याव्यात, या मागणीसाठी १५ आॅगस्टला आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही ते म्हणाले.

कांबा येथील आदिवासी शेतकºयांच्या जमिनीचा विषय खूपच जुना आहे. अनेक वेळा तारांकित प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे योग्य चौकशी करूनच निर्णय घेण्यात येईल.
- प्रसाद उकर्डे,
प्रांताधिकारी, कल्याण.

सर्व अधिकारी भ्रष्ट आहेत. प्रत्येक वेळी दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. त्यामुळे आता आदिवासी शेतकºयांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत.
- विशाल गुप्ता,
अध्यक्ष, परिहत चॅरिटेबल ट्रस्ट

Web Title: Tribal Farmer protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.