ठाण्यात आदिवासींनी साजरा केली वसुबारस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 01:50 PM2017-10-16T13:50:31+5:302017-10-16T14:59:41+5:30

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा  ( भांगरे ) यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपा नृत्य सादर करण्यात आले.

Tribal people in Thane celebrated Vasubars | ठाण्यात आदिवासींनी साजरा केली वसुबारस

ठाण्यात आदिवासींनी साजरा केली वसुबारस

googlenewsNext

ठाणे : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा  ( भांगरे ) यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपा नृत्य सादर करण्यात आले. माजी आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येणारे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी मात्र दांडी मारल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रांगणातील तारपाधारी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच आदिवासी संस्कृतीची ओळख सांगणारे तारपा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या चौकात देखील कार्यक्रम पार पडला.
ठाणे आणि पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, क-ठाकूर,म-ठाकूर, ई. आदिवासी जमातीचे बांधव गुण्यागोविंदाने राहतात. आदिवासी जिल्ह्यातील ओळख व आदिवासी संस्कृतीचे प्रतिक म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपाधारी अर्ध पुतळा उभारण्यात आलेला आहे. याप्रसंगी आदिवासी वारली समाज सेवा मंडळ अध्यक्ष दत्तात्रय भुयाळ, हंसराज खेवरा, दत्ता भुयार, भाऊसाहेब गंभीरे, गणेश वाघे, सुनील तुकाराम भांगरे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Tribal people in Thane celebrated Vasubars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.