शेती हंगामासाठी आदिवासी माघारी

By admin | Published: May 7, 2017 01:30 AM2017-05-07T01:30:37+5:302017-05-07T01:30:37+5:30

महिन्यावर येऊन ठेपलेल्या पावसाळयापूर्वी शेतीच्या हंगामाची पूर्व तयारी करण्यासाठी गावपाड्यातील स्थलांतरीत आदीवासी

Tribal withdrawal for agricultural season | शेती हंगामासाठी आदिवासी माघारी

शेती हंगामासाठी आदिवासी माघारी

Next

राहुल वाडेकर/  लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : महिन्यावर येऊन ठेपलेल्या पावसाळयापूर्वी शेतीच्या हंगामाची पूर्व तयारी करण्यासाठी गावपाड्यातील स्थलांतरीत आदीवासी पुन्हा माघारी परतला आहे. यंदा पाउस वेळेवर पडण्याचा अंदाज वर्तविला गेल्या तो झटून तयारीला लागला आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत आहेत़ कुणी घराच्या छपरांची डागडुजी करीत आहे़ शेतकरी शेतात राब-राबणी, बांध बंदीस्ती करतांना दिसत आहे. एकंदरीत सर्वच पावसाळयापूर्व तयारी लागलेले दिसत आहेत़ चार महिने कामधंद्याकरीता बाहेर गावी गेलेली मजुर कुंटुंबे आपल्या माहेरवाटी येतांना दिसत आहे़ विक्रमगड तालुक्यात जुन ते सप्टेंबर असा चार महिने शेतीचा हंगाम असतो़ व पावसाळयात ज्या काही वस्तू लागतात त्या चार महिने पुरेल अशा बाजारात जाऊन खरेदी करुन ठेवल्या जात आहेत़
विक्रमगड व परिसरात शेती हंगामाचे चार महिने सोडले तर तसा कोणताही रोजगार देणारा मोठा उदयोग धंदा नाही त्यामुळे शेती हंगाम संपताच येथील गाव-खेडयापाडयावरील आदिवासी मजूर कुंटुंब रोजगारासाठी शहरात स्थलांतरीत होत असतो़ तो म महिन्यातच माघारी परततो. या काळात तो चार महिने स्वत:ची शेती करतो आधुनिक युगातही नांगरांना मागणी
सध्याचे युग हे आधुनिग व नविन तंत्रज्ञाचे युग असल्याने तो स्वत:च्या किंवा भाड्याच्या ट्रॅक्टर अथवा टिलरने शेत नांगरतो. यामुळे वर्षभर बैल जोडीला पोसावे लागत नाही. तसेच त्यांच्यावर होणारा खर्चही वाचतो. शिवाय कमी वेळेत जास्त काम होते़ परंतु जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार गावठी बैलाद्वारे केलेलया नांगरणीमुळे नांगरट खोलवर होऊन जमीनीचा कस व्यवस्थित राहतो. पिकास हे चांगले असते़ ग्रामीण भागात आजही बैलांद्वारे केलेल्या नांगरांचा वापर जास्त प्रमाणात होतांना दिसतो़
शेतमजूर पुरेसे मिळत नाहीत आणि मिळतात ते परवडत नाहीत. यामुळे सध्या भात लावणी, मळणी, उफणणी या सर्वच कामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. त्यामुळे या परीसरातून शेतीसाठी लागणारे पशूधन झपाट्याने घटू लागले आहे. व सगळ्यांचाच ओढा यंत्राद्वारे जमिनीची मशागत करण्याकडे आहे.

पावसाळयापूर्वी आदिवासींची तयारी

पावसाळयाच्या अगोदर म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीपर्यत शेतीच्या मशागतीची कामे करतांना येथील आदिवासी शेतकरी दिसतो़ पोटासाठी बाहेर गावी स्थलांतरी झालेले कुटुंब पावसाळयाच्या
अगोदरच पूर्वी तयारीसाठी आपल्या घरी परतात व शेतीमध्ये राबराबणी करुन तिची सुपिकता वाढविण्याचा प्रयत्न करतात.
शेतीसाठी लागणारी अवजारे कोयता, नांगर, यांची दुरुस्ती तर शेतामध्ये पेरण्यासाठी साठवणीतील बि-बियाणे बाहेर काढली जातात. शेताची बांध-बंधिस्ती केली जाते़ आवश्यक त्या सर्व गोष्टी पाउस पडण्याच्या अगोदच केली जातात़

घराचीही डागडुजी
पावसाळयात घरात गळू नये याकरीता कौले चाळवून घेतलेली जातात अगर नविन कौले बसविली जातात त्यावर भाताचा पेढा टाकला जातो, घरासमोर पागोळयाचे पाणी आत येउ नये यासाठी छोटीशी पडवी बांधली जाते़ पावसाळयासाठी घराची डागडुजी करुन चार महिने पुरेल असे साहित्य साठवून ठेवले जाते़
शेतीला महागाईची झळ
दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे होत चालेले आहे़ निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे बेभरवशी पडणे, मजुरीचे, बि-बियाणांचे, खते, नविन अवजारांचे वाढलेले दर यामुळे शेतीसाठी करावा लागणारा खर्च वाढतो आहे. तो करुनही पाहीजे तसे उत्पन्न हाती पडत नसल्याने आर्थिक नुकसान होते. यासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? हा प्रश्न निर्माण होतो. या साऱ्यामुळे शेती करणे दिवसेदिवस जिकिरीचे होत असल्याने शेतक-यांचे म्हणणे आहे़ परंतु पूर्वापार असलेला हा व्यवसाय आजही ग्रामीण भागात जोपासाला जात आहे़

शेतीसाठी नवीन खरेदी
शेतीसाठी लागणाऱ्या नविन साहित्याची हयाच महिन्यात शेतकरी खरेदी करीत असतात. नांगराकरीता फाळ, भाड्याची बैलजोडी, नविन विळे, नविन लाकडी नांगर बनवून घेणे आदी करीत असतांत़
घरावर टाकण्यासाठी मेणकापड अथवा ताडपत्री ही अत्यावश्यक वस्तू एकदा का पाउस सुरु झाला की शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बाजारात जाणे शक्य नसते शेतीची कामे चार महिने त्याना उरकून घ्यावी लागत असतात़


जमिनीच्या
तुकड्यांमध्ये वाढ
दिवसेंदिवस लोकंसख्या वाढत चालेली असल्याने मोठया कुटुंबाचे पूर्वीप्रमाणे एकत्र राहाणे दुरापास्त होत चाललेले आहे़ त्यामुळे असलेल्या जमीनीची आपसांत वाटणी करुन कुटुंब विभक्त होत असल्याने जमीनीच्या तुकडीकरण्यात वाढ होत असून त्यामुळे शेतीवर होणारा खर्च वाढतो तर त्यापासून मिळणारे उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत जाते. यावर कोणताही इलाज करता येत नाही.

Web Title: Tribal withdrawal for agricultural season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.