खंडणी प्रकरण : छोटा शकील, इक्बाल कासकरविरूद्ध मोक्का; सात आरोपींविरूद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 06:17 PM2017-10-11T18:17:58+5:302017-10-11T18:18:15+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ छोटा शकील आणि इक्बाल कासकरसह सात आरोपींविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल केले.

Tribute case: Chhota Shakeel, Mokka against Iqbal Kaskar; Action against seven accused | खंडणी प्रकरण : छोटा शकील, इक्बाल कासकरविरूद्ध मोक्का; सात आरोपींविरूद्ध कारवाई

खंडणी प्रकरण : छोटा शकील, इक्बाल कासकरविरूद्ध मोक्का; सात आरोपींविरूद्ध कारवाई

Next

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ छोटा शकील आणि इक्बाल कासकरसह सात आरोपींविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल केले. वरिष्ठ अधिका-यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
खंडणी विरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सैयद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना गत महिन्यात अटक केली. जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा त्यांच्याविरूद्ध कासारवडवली येथे तर दोन गुन्हे ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एक महिन्याच्या तपासामध्ये पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि आरोपींच्या जबाबातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाले. मोक्काच्या प्रस्तावास वरिष्ठांची मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी सात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कासारवडवली येथील खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. छोटा शकील, इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सैयद, पंकज गंगर तसेच शम्मी आणि गुड्ड या बिहारच्या दोन शुटर्सविरूद्ध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सैयद आणि पंकज गंगर हे सध्या पोलीस कोठडीत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. 
संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी 1999 साली महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आला. या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला सहा महिने अटकपूर्व जामीन मिळत नाही. न्यायालय आरोपीला एक महिन्याची पोलीस कोठडी देऊ शकते. इतर गुन्ह्यांमध्ये तीन महिन्यांच्या आत पोलिसांना आरोपपत्र दाखल करावे लागते. मोक्का अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सहा महिन्यांचा अवधी मिळतो. या गुन्ह्यामध्ये न्यायालय आरोपीला एक महिन्यासाठी पोलीस कोठडीत पाठवू शकते. 

Web Title: Tribute case: Chhota Shakeel, Mokka against Iqbal Kaskar; Action against seven accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा