श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:09 AM2019-11-02T00:09:42+5:302019-11-02T00:10:02+5:30

अग्निशमन केंद्राच्या वास्तू झाल्या जीर्ण : दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

Tribute paid, but what about security measures ?; The lives of the soldiers were hanged | श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

Next

कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका परिसरात बचाव कार्यासाठी गेलेले केडीएमसीतील अग्निशमन दलातील प्रमोद वाघचौडे आणि अनंत शेलार या दोन जवानांचा विहिरीतील विषारी वायुमूळे मृत्यू झाल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. या दोघांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. अग्निशमन केंद्राच्या वास्तूही सुस्थितीत नाहीत. त्या जीर्ण झाल्याने येथील जवानांचा जीव टांगणीला लागला आहे.

मंजूर पदे आणि कार्यरत मनुष्यबळ, यातील तफावतीमुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची होणारी परवड आणि अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत असताना शहरात घडण्याºया दुर्घटनांमध्ये जवानांचे बळीही गेल्याचे मागील वर्षी पाहायला मिळाले. विहीर दुर्घटनेत वाघचौडे आणि शेलार यांचा बळी गेल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबरला मध्यरात्री चायनीज खाद्यपदार्थांच्या दुकानाला लागलेली आग विझविताना लीडिंग फायरमन जगन आमले यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनानंतरही जवानांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही अग्निशमन दलातील जवान सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत असताना दुसरीकडे अशा दुर्घटनेवेळी धावून जाणाºया जवानांचे जीवही धोक्यात आहेत. डोंबिवलीतील अग्निशमन केंद्रातील छताला असलेल्या प्लास्टरची पडझड झाल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच वावरावे लागत आहे. या केंद्रात बहुतांश ठिकाणी भिंतीमधून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणचे प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. यासंदर्भात ९ जून २०१९ ला मुख्य अग्निशमन अधिकारी, संबंधित खात्याचे उपायुक्त आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दुसरीकडे पश्चिमेतील आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक अवस्थेत असलेली इमारत दुरुस्त करावी, यासंदर्भात तीन वर्षांपासून नगरसेवक मोहन उगले यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कामाची फाइलही बनवली, पण अंमलबजावणीच नाही. या धोकादायक अवस्थेतील केंद्रातील मुख्यालय चिकणघर परिसरात हलवले आहे. पण केंद्र आधारवाडीला जैसे थे ठेवले आहे.

लवकरच कार्यवाही होईल
आधारवाडी येथील केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाणार आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तळमजल्यावर अग्निशमन केंद्राची वाहने, पहिल्या मजल्यावर संबंधित विभागाचे मुख्य कार्यालय तर दुसºया व तिसºया मजल्यावर ‘क’ प्रभागाचे कार्यालय असेल, असे नियोजन आहे. डोंबिवली केंद्रच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवला आहे. त्याबाबतही कार्यवाही होईल, असे केडीएमसीचे मुख्य अग्शिमन अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

Web Title: Tribute paid, but what about security measures ?; The lives of the soldiers were hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.