लकी कंपाउंड घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली
By कुमार बडदे | Updated: April 4, 2023 19:09 IST2023-04-04T19:09:34+5:302023-04-04T19:09:57+5:30
लकी कंपाउंड घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

लकी कंपाउंड घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली
मुंब्रा : शिळफाटा-म्हापे रस्त्या जवळील लकी कंपाउंड मधील आदर्श ही सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ ला पत्यासारखी कोसळली होती. यात १८ लहान मुलांसह ७४ जणांचा मृत्यू झाला होता.या घटनेला मंगळवारी १० वर्षे झाली. या घटनेतील मृतांना शिळगावचे पोलीस पाटील संतोष भोईर, मनसेचे शिळ- देसाई अध्यक्ष शरद पाटील, काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा वैशाली भोसले, इंटरनॅशनल ह्युमन राईटचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद वास्कर आदिंनी घटनास्थळी मेणबत्ती पेटवून तसेच पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
यावेळी या घटनेतील मृतांना न्याय मिळावा यासाठी या घटने संदर्भात सुरु असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर न्यायनिवाडा करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी.तसेच घटनास्थळी मृतांचे स्मारक उभारण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली.