विद्यार्थी साकारणार तिरंग्याची कलाकृती

By admin | Published: August 13, 2016 03:50 AM2016-08-13T03:50:51+5:302016-08-13T03:50:51+5:30

भारतमातेला सलाम करण्यासाठी दिवा येथील चित्रकार प्रवीण घुमरे स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला पालघरमधील मान आदिवासी आश्रमशाळेत तेथील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अंदाजे ४० बाय

Tricolor artwork for the students to come out | विद्यार्थी साकारणार तिरंग्याची कलाकृती

विद्यार्थी साकारणार तिरंग्याची कलाकृती

Next

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवली

भारतमातेला सलाम करण्यासाठी दिवा येथील चित्रकार प्रवीण घुमरे स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला पालघरमधील मान आदिवासी आश्रमशाळेत तेथील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अंदाजे ४० बाय २५ फुटांचा राष्ट्रध्वज साकारणार आहेत. पाटी व रंगांचा वापर करून ही कलाकृती साकारली जाणार आहे. त्याची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉडर््स’मध्ये करण्यासाठी घुमरे प्रयत्नशील आहेत.
घुमरे यांनी रहेजा कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टची पदवी घेतली आहे. ते मुंबईतील एका जाहिरात एजन्सीत कामाला आहेत. नोकरीमुळे व्यस्त असतानाही त्यांनी मित्रांच्या साथीने युवा मंच स्थापन केला आहे. त्याद्वारे ते विविध समाजोपयोगी कामे करत आहेत. दरवर्षी ते पालघर येथील मान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतात. या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ते शाळेतच यंदा भारतमातेला सलाम करणारी कलाकृती साकारणार आहेत.
आजच्या संगणकाच्या युगात शाळेतून पाट्या कालबाह्य होत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही तंत्रज्ञानाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थी आजही पाटीवरच आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करत आहेत. पाटीवर पेन्सिलने बाराखडी, गणिते सोडवण्यासोबत ते चांगल्या प्रकारे चित्रकला जोपासत आहेत. एखाद्या चित्राची रेषा वेडीवाकडी गेली, तर पाटीवर ती लगेच पुसून तिला वळण देता येते. तो प्रकार कागदावर पेन्सिलद्वारे करता येत नाही. त्यासाठी खोडरबरची गरज भासते, असे घुमरे म्हणाले.

२६० हून अधिक पाट्या, २० विद्यार्थी
जवळपास २६० पेक्षा जास्त पाट्यांचा साहाय्याने जलरंगाचा वापर करून राष्ट्रध्वजाची कलाकृती साकारली जाणार आहे. शाळेतील २० पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होतील.

राष्ट्रप्रेरणा जागृत करण्याचा उद्देश
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्याकडून काहीतरी कलाकृती घडवून त्यांच्यातील आत्मविश्वास व राष्ट्रभक्ती वाढीस लावणे, हा दुहेरी उद्देश यातून साध्य केला जाणार आहे.

त्या विक्रमाची प्रतीक्षा
यापूर्वी घुमरे यांनी डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त पेपर क्विलिंगपासून शिवछत्रपती यांचे चित्र साकारले होते. त्यांच्या या कलाकृतीची बरीच चर्चा झाली होती. ही कलाकृती ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’साठी पाठवण्यात आली आहे. घुमरे त्या विक्रमाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर, आता ते पाट्या व रंगांचा वापर करून राष्ट्रध्वजाची कलाकृती साकारणार आहेत.

Web Title: Tricolor artwork for the students to come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.