भाजपकडून तिरंगा यात्रेचे आयोजन; पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा पदयात्रेत सहभाग
By सदानंद नाईक | Updated: August 14, 2023 18:56 IST2023-08-14T18:56:46+5:302023-08-14T18:56:59+5:30
भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालय मार्गे कॅम्प नं-३ परिसरात सोमवारी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते.

भाजपकडून तिरंगा यात्रेचे आयोजन; पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा पदयात्रेत सहभाग
उल्हासनगर: भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालय मार्गे कॅम्प नं-३ परिसरात सोमवारी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भाजप पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
उल्हासनगरात दरवर्षीप्रमाणे आमदार कुमार आयलानी यांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. आमदार कार्यालय पासून सुरू झालेली यात्रा अमन टॉकीज रस्ता मार्गे उल्हासनगर महापालिका, टर्निंग पॉईंट, गोल मैदान, नेहरू चोक ते आमदार कार्यालय दरम्यान तिरंगा यात्रा कडून आमदार कार्यालय येथे समायोजन केले. यात्रेत माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनू पुरसवानी, महेश सुखरामानी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, योगा संस्थांचे पदाधिकारी, शाळेतील मुले, वरिष्ठ नागरिक, यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.