माणुसकीचा अंत! कॅन्सर रुग्णाचा दुचाकीवरून मुलुंड ते भिवंडीपर्यंतचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:11 PM2020-04-11T20:11:17+5:302020-04-11T20:11:46+5:30

या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं, पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले.

The trip from Seat to Mulund to Bhiwandi is a life-threatening journey for a cancer patient vrd | माणुसकीचा अंत! कॅन्सर रुग्णाचा दुचाकीवरून मुलुंड ते भिवंडीपर्यंतचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

माणुसकीचा अंत! कॅन्सर रुग्णाचा दुचाकीवरून मुलुंड ते भिवंडीपर्यंतचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

Next

भिवंडी: सध्याच्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झालेल्या काळात लाखो भुकेल्यांची भूक भागविण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले असतानाच एक शस्त्रक्रिया झालेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला मुलुंड ते भिवंडी येथे निवासस्थानी सोडण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या कॅन्सर पीडित रुग्णाला त्याच्या मुलाने दवाखान्यातील सामानाच्या पिशव्या घेऊन आईसह दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करावा लागला. या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं, पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले. पण कोणीही तीन रुग्णवाहिका अथवा वाहनांची व्यवस्था करून दिली नाही हे पाहिल्यावर म्हणावंसं वाटते की, येथे ओशाळली माणुसकी.....

भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात राहणारे विरस्वामी कोंडा यांना तोंडाचा कर्करोग झाला होता .त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी त्यांच्या वर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुंबई टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 हजार रुपये जमा केले. परंतु तीन महिने झाल्यावर तुमच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन महिने थांबावे लागेल, खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे सुचवित त्यासाठी मुलुंड येथील एका खासगी हॉस्पिटलचे नाव सुचविले. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे या रुग्णाची व त्यांच्या परिवाराची मोठी परवड झाली. 

शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी घरी जाण्याचे सुचविले, परंतु त्या दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र बंद असल्याने डॉक्टरांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. त्यानंतर रुग्णाच्या नाकातील जेवण देण्याची नळी बदलणे, इतर ट्रीटमेंट करणे यासाठी पुन्हा भिवंडीवरून येणे जमणार नसल्याने लक्ष्मी कोंडा यांनी मुलुंड परिसरातील गुरुद्वारात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या ठिकाणीसुद्धा आठ दिवस झाल्यानंतर तेथील व्यवस्थापकांनी घरी जाण्याबाबत तगादा लावल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ते भिवंडी येथील आपल्या घरी दुचाकीवरून रुग्णासह मुलाबरोबर जीवघेणा प्रवास करून घर गाठले.  

विरस्वामी कोंडा यांचा मुलगा राजू कोंडा याने परिसरात वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका विचारणा केली तर अव्वाच्या सव्वा दर आकारत कोणी 4 तर कोणी 5 हजार रुपयांची मागणी करू लागल्याने राजू कोंडा याने आपल्या वडिलांसह आईला दुचाकीवरून ट्रिपल सीट भिवंडी येथे घेऊन येण्याचा निर्णय घेतला, सोबत रुग्णालयात घेऊन गेलेले साहित्य यांच्या तीन भल्या मोठ्या पिशव्या घेऊन हा प्रवास भिवंडीपर्यंत झाला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असताना हे ट्रिपल सीट कुटुंबीय आलेच कसे हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो ,पण पोलीस बाईक वर पेशंट असल्याचे बघून पुढे जाऊ देत होते ,परंतु या पैकी कोणीही या रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान  ठाण्यात रस्त्यात बाईकमधील पेट्रोल संपले अशा अवस्थेत एक नागरिक देवदूत बनून आला ज्याने आपल्या बाईक मधील पेट्रोल काढून तो यांच्या बाईक मध्ये दिल्याने ते कसेबसे रात्री 10.30 वाजता भिवंडी शहरात दाखल झाले .

शासकीय यंत्रणा, विविध स्वयंसेवी संस्था सध्याच्या करोना विरुद्धच्या लढ्यात आपापल्या परीने काम करीत असताना सुमारे 25 किलोमीटर च्या प्रवासात एक ही भेटू नये, पोलिसांनी जिल्हा प्रशासनाशी बोलून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर अशा परिस्थितीत या रुग्णाची अशी परवड झाली नसती. सर्वांच्या मनातील माणुसकी अशा आणीबाणीच्या काळात कठोर झाली का ? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.

Web Title: The trip from Seat to Mulund to Bhiwandi is a life-threatening journey for a cancer patient vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.