दरोडेखोरांना तिहेरी जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निर्णय, मोक्काअंतर्गतही झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:00 AM2023-06-08T08:00:54+5:302023-06-08T08:02:12+5:30

अशा प्रकारे तिहेरी जन्मठेपेची ठाणे न्यायालयाने प्रथमच अशी शिक्षा सुनावली आहे.

triple life imprisonment for robbers thane court decision action was also taken under mokka | दरोडेखोरांना तिहेरी जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निर्णय, मोक्काअंतर्गतही झाली कारवाई

दरोडेखोरांना तिहेरी जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निर्णय, मोक्काअंतर्गतही झाली कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दरोड्यासाठी एका बारमालकासह दोघांचा खून करणाऱ्या जांबूआ टोळीतील अमरू मांगो बबेरिया (२२), राजू मेढा (१९), उदयसिंग ऊर्फ छोटू बबेरिया (२१) आणि बापूसिंग सिंगाढे (२०, सर्व रा. जांबूआ जिल्हा, मध्य प्रदेश) यांना खून व दरोड्यात जन्मठेप तसेच माेक्कांतर्गत दाेनदा जन्मठेप व प्रत्येकी ११ लाखांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र तथा मोक्का न्यायाधीश अमित शेटये यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त वर्षभराच्या शिक्षाही सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी दिली. अशा प्रकारे तिहेरी जन्मठेपेची ठाणे न्यायालयाने प्रथमच अशी शिक्षा सुनावली आहे.

अवधनगर भागातील  बारमालक राकेश मोरे (३१) हे १७ फेब्रुवारी २०१० रोजी दुचाकीवरून घरी निघाले होते. त्याचवेळी दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पैशांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केल्याने उदयसिंगने राकेशवर गोळी झाडली. ही गोळी छातीतून आरपार जाऊन पाठीतून बाहेर गेली. यात त्याच्याकडील पैशांची बॅग रुद्राक्षाची सोन्याची माळ, पाकीट, मोबाइल व सोन्याच्या अंगठ्या असा एक लाख ६८ हजारांचा ऐवज चोरला. त्यानंतर आणखी एकावर  चोरीसाठी गोळीबार केला होता. या दोघांच्या खुनानंतर अमरू, राजू आणि बापूसिंग यांना २० ऑगस्ट २०१० रोजी, तर उदयसिंग याला १२ मे २०११ रोजी अटक झाली. यातील बसूला दहा वर्षांनंतर अटक झाली. त्याचा खटला प्रलंबित आहे. तर  मोहनसिंग वसुनिया  फरार आहे.

पोलिस ठाण्यातून पसार

पाचही आरोपीं पालघर पोलिस ठाण्याची कौले तोडून पळाले होते. त्यांच्यावर पालघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.  हे खून करण्यापूर्वी ते मनोरच्या एका गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटले होते. अटकेनंतर  दागिने, मोबाइल, रोकड तसेच तीन गावठी कट्टे व १२ काडतुसे हस्तगत केली होती. चौघांना बोईसरमधून पकडले.  पोलिस अधिकारी एन. के. मुरादे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

२ गंभीर गुन्हे

- अमरू आणि त्याच्या टोळीवर खून, दरोड्यासह २० ते २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- एका गुन्ह्यात अमरू आणि उदयसिंग यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती.

- यात ते जामिनावर सुटले होते. याच काळात त्यांनी दोन खुनांसह दरोड्याचा प्रकार केला होता. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आले.

- विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी आरोपींच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार शिर्के यांनी काम पाहिले.

 

Web Title: triple life imprisonment for robbers thane court decision action was also taken under mokka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.